आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Shilpa Shetty's One Year Old Daughter Sameesha, Son Vian, Husband, Mother And In Laws Tested Covid Positive, Whole Family Isolated On Doctor's Advice

शिल्पाच्या घरात कोरोनाचा शिरकाव:शिल्पा शेट्टीची एक वर्षाची मुलगी समिषा, मुलगा विहान, नवरा, आईसह सासु-सास-यांना कोरोनाची लागण, डॉक्टरांच्या सल्ल्याने संपूर्ण कुटुंब झालं आयसोलेट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर दिली माहिती

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या संपुर्ण कुटुंबाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यात तिच्या एक वर्षीय मुलीचाही समावेश आहे. याशिवाय शिल्पाचा आठ वर्षांचा मुलगा विहान, पती राज कुंद्रा, आणि सासु-सासरेही कोविड पॉझिटिव्ह आहेत. शिल्पाचा मात्र कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सध्या तिचे संपूर्ण कुटुंब डॉक्टरांच्या सल्ल्याने घरातच आयसोलेट आहे.

  • सोशल मीडियावर दिली माहिती

शिल्पाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट करत ही माहिती दिली आहे. 'मागील 10 दिवस आमच्या कुटुंबासाठी खूप कठीण होते. माझ्या सासु-सासऱ्यांची कोरोनो चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर समिषा, विहान, माझी आई आणि आता राज यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. हे सगळे त्यांच्या त्यांच्या रुममध्ये आयसोलेशनमध्ये आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहेत. '

  • घरातील दोन कर्मचा-यांनाही झाला संसर्ग

शिल्पाने आपल्या पोस्टमध्ये पुढे सांगितले, 'आमच्या घरातील दोन कर्मचारी देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे आणि वैद्यकीय सुविधेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.'

  • शिल्पाचा रिपोर्ट निगेटिव्ह

पुढे शिल्पाने लिहिले, 'देवाच्या कृपेने सर्व जण बरे होत आहेत. माझी कोरोना चाचणी ही निगेटिव्ह आली आहे. नियमांनुसार सर्व खबरदारी घेतली जात आहे. बीएमसी आणि अधिकाऱ्यांचे त्यांनी केलेल्या मदतीचे आम्ही आभारी आहोत. आमच्यासाठी प्रार्थना करण्याचे देखील आभार.'

  • चाहत्यांना केले मास्क घालण्याचे आणि मानसिकदृष्टा सकारात्मक राहण्याचे आवाहन

शिल्पा म्हणते, 'तुम्ही करोना पॉझिटिव्ह असो वा नसो, कृपया मास्क घाला, स्वच्छता ठेवा आणि सुरक्षित रहा.. तरीसुद्धा मानसिकदृष्ट्या पॉझिटिव्ह रहा.'

बातम्या आणखी आहेत...