आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Shilpa Shetty's Return To Films After 14 Years, Hungama 2 Will Be Released On July 23, The Same Day Will Be Decided On The Extension Of Raj Kundra's Remand

कमबॅकच्या वेळीच शिल्पा बॅकफूटवर:14 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करतेय शिल्पा, 23 जुलैला रिलीज होतोय 'हंगामा 2'; त्याच दिवशी राज कुंद्राच्या रिमांडबाबत होणार निर्णय

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिल्पाचा शेवटचा चित्रपट 2007 मध्ये आला होता

अभिनेत्री शिल्पा शेट्टी 'हंगामा 2' या चित्रपटाद्वारे तब्बल 14 वर्षानंतर चित्रपटांत कमबॅक करत आहे. हा चित्रपट 23 जुलैला हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. शिल्पा आणि तिच्या चाहत्यांसाठी हा एक सेलिब्रेशनचा काळ होता. परंतु पॉर्न रॅकेटमध्ये शिल्पाचा पती राज कुंद्राला अटक झाल्याने केवळ शिल्पाच नव्हे तर कदाचित 'हंगामा 2' ची संपूर्ण टीमच आता सेलिब्रेशनच्या मूडमध्ये नसावी. शिल्पा या कॉमेडी चित्रपटाद्वारे कमबॅक करत आहे, पण त्याचवेळी तिच्या वैयक्तिक आयुष्यात मोठे वादळ आले आहे.

राज कुंद्राला 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. म्हणजे 23 जुलै रोजी 'हंगामा 2' चा ओटीटी प्रीमियर होईल आणि त्याच दिवशी राज कुंद्राच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात येईल की त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात येईल याचा निर्णयही घेण्यात येईल.

पती राज कुंद्रासोबत शिल्पा शेट्टी.
पती राज कुंद्रासोबत शिल्पा शेट्टी.

शिल्पाचा शेवटचा चित्रपट 2007 मध्ये आला होता
शिल्पा शेट्टी 2007 मध्ये 'लाइफ इन मेट्रो' आणि 'अपने' या चित्रपटांमध्ये मोठ्या पडद्यावर दिसली होती. यानंतर ती 'ओम शांती ओम' या चित्रपटातील पार्टी साँगमध्ये झळकली. नंतर ती 'दोस्ताना' या
चित्रपटातील एका गाण्यातही दिसली. शिल्पाने निर्माती म्हणून 'ढिश्कियाऊं' हा चित्रपट बनवला. यातही तिचा स्पेशल अपिअरन्स होता.

प्रियदर्शन यांचाही कमबॅक चित्रपट
आता 14 वर्षानंतर शिल्पा प्रियदर्शन दिग्दर्शित 'हंगामा 2' मध्ये दिसणार आहे. शिल्पाच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळाती 'चुरा के दिल मेरा' हे हिट गाणेही या चित्रपटात पुन्हा घेण्यात आले आहे. या गाण्यात ती मिजान जाफरीसोबत थिरकताना दिसतेय.

याशिवाय या चित्रपटात प्रणीता सुभाष आणि परेश रावल यांच्यासुद्धा महत्त्वाच्या भूमिका आहेत. दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा हा बॉलिवूडमधील कमबॅक चित्रपट आहे. प्रियदर्शन यांचा पूर्वीचा बॉलिवूड चित्रपट 'रंगरेज' हा होता. तो 2013 मध्ये आला होता.

‘हंगामा 2’ या चित्रपटातील 'चुरा के दिल मेरा' या गाण्यात अभिनेता मिजान जाफरीसोबत शिल्पा शेट्टी.
‘हंगामा 2’ या चित्रपटातील 'चुरा के दिल मेरा' या गाण्यात अभिनेता मिजान जाफरीसोबत शिल्पा शेट्टी.

शिल्पाला थिएटरऐवजी ओटीटीवर परत येण्याची खंत नव्हती
शिल्पा या चित्रपटासाठी खूप उत्साही होती. शिल्पाने सांगितले होते की, आपला कमबॅक चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत नाही याबद्दल तिला खेद नाही. तिला याविषयी ती नर्व्हसदेखील नव्हती.
याउलट, तिच्या मते ओटीटीवर कंटेंट सर्वात महत्वाचा असतो आणि हा विनोदी चित्रपट ओटीटी रिलीजमुळे अधिक लोकांपर्यंत पोहोचेल.

सोशल मीडियावर शिल्पा लोकप्रिय, पण याचा फायदा चित्रपटाला नाही
शिल्पाची सोशल मीडियावर चांगली फॅन फॉलोइंग आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 2.14 कोटी फॉलोअर्स आहेत. या सर्वांचा फायदा हंगामा 2 च्या प्रमोशनसाठी घेता आला असता.

शिल्पा मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत होती. या 14 वर्षांच्या काळात शिल्पा कधीही प्रसिद्धीपासून दूर राहिली नाही. योग व्हिडिओ, फिटनेस सेशन आणि टिक टॉकमुळे ती प्रत्येक वेळी चर्चेत राहिली आहे.

पण, राजच्या अटकेनंतर शिल्पा 'सुपर डान्सर4' या रिअ‍ॅलिटी शोच्या चित्रीकरणाला अनुपस्थित होती. आगामी काळात कदाचित राजला जामीन मिळेलही पण तरीदेखील शिल्पासाठी टीव्ही शो, सोशल मीडिया, प्रमोशन हे सर्व पुन्हा सुरू करणे इतके सोपे राहणार नाही.

कोर्टाची पायरी चढणे ही नवीन गोष्ट नाही, परंतु सध्या हे प्रकरण गंभीर आहे
शिल्पा शेट्टी हिला चौकशीसाठी बोलावले जाईल की नाही हे अद्याप ठरलेले नाही. शिल्पा राजच्या प्रत्येक व्यवसायात भागीदार आहे. त्यामुळे शिल्पाला पोलिस चौकशीला सामोरे जावे लागू शकते. राज आणि शिल्पासाठी कोर्टाची पायरी चढणे ही काही नवीन गोष्ट नाही. पण यावेळी प्रकरण खरोखरच गंभीर बनले आहे.

बातम्या आणखी आहेत...