आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॅपी बर्थडे:8 वर्षांचा झाला शिल्पा-राज कुंद्राचा मुलगा विआन, अभिनेत्रीने बालपणीच्या छायाचित्रांचा व्हिडीओ बनवून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2012 मध्ये विआनचा जन्म झाला.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचा मुलगा विआन आज आपला आठवा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवसाचे औचित्य साधत शिल्पाने आपल्या मुलाच्या बालपणीच्या छायाचित्रांचा एक खास व्हिडीओ बनवून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक क्यूट व्हिडीओ स्लाइड शेअर करत शिल्पाने लिहिले की, 'माझा प्रिय मुलगा विआन राज, आठव्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी प्रत्येक मार्गातील प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत राहण्याचे वचन देते. जेव्हा जेव्हा तुला मिठीची गरज असेल मी हात पसरुन नेहमी तुझ्याजवळ उभी राहीन. मी कधीही तुझ्यावर प्रेम करणे किंवा विश्वास ठेवणे सोडणार नाही, कारण तू माझा सन-शाइन (मुलगा आणि प्रकाश) आणि माझा आत्मा आहे. आठव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी तुझ्यावर खूप प्रेम करते.'

शेअर केलेला हा व्हिडीओ विआन, राज आणि शिल्पाच्या जुन्या छायाचित्रांच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने अनेक सुंदर क्षण दाखवले आहेत. शिल्पा आणि राज कुंद्रा यांचे 2009  मध्ये लग्न झाले. त्यानंतर 2012 मध्ये विआनचा जन्म झाला. या दाम्पत्याला एक मुलगी असून याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात सरोगसीच्या मदतीचे तिचा जन्म झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...