आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पा शिरोडकरचा वाढदिवस:'छैया छैया' गाण्यात मलायका अरोराला नव्हे तर शिल्पाला होती निर्मात्यांची पहिली पसंती, लठ्ठपणामुळे हातून गेला होता चित्रपट

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज शिल्पाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जाणून घेऊयात तिच्याविषयी...

90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शिरोडकर आज 52 वर्षांची झाली आहे. 20 नोव्हेंबर 1969 रोजी शिल्पाचा मुंबईत मराठी कुटुंबात जन्म झाला. शिल्पाने 2010 मध्ये आलेल्या 'बारुद' या चित्रपटात शेवटचे मोठ्या पडद्यावर काम केले होते. ब-याच काळापासून शिल्पा बॉलिवूडपासून दूर आहे. 1990 मध्ये रिलीज झालेल्या 'किशन कन्हैया' या चित्रपटात ती बोल्ड अवतारात दिसली होती. एवढ्या वर्षांत शिल्पाच्या लूकमध्ये फारच बदल झालेला दिसून येतोय. तिचे आता वजनदेखील बरेच वाढलेले दिसते.

मिथून चक्रवर्तीसोबत जमली होती सुपरहिट जोडी
शिल्पा शिरोडकरने अनिल कपूरची मुख्य भूमिका असलेल्या 'किशन कन्हैया' या चित्रपटातून ओळख निर्माण केली. 1989 साली मिथून चक्रवर्ती आणि रेखा यांची प्रमुख भूमिका असलेला 'भ्रष्टाचार' तिचा पहिला चित्रपट होता. त्यात तिने एका आंधळ्या मुलीची भूमिका केली होती. पण तिला प्रसिद्धी मिळाली ते 'किशन कन्हैया'मधून. या चित्रपटानंतर शिल्पाने कधीही मागे वळून पाहिले नाही. या चित्रपटात शिल्पाने बोल्ड सीन दिले होते. चित्रपटातील 'राधा बिना' या गाण्यात तिने पारदर्शक साडी परिधान केली होती. यासह तिची हिट जोडी मिथून चक्रवर्तीसोबत जमली होती. या दोघांनी एकुण 9 चित्रपटात एकत्र काम केले होते. यात भ्रष्टाचार, हिटलर, रंगबाज, अपने दम पर, जीवन की शतरंज, स्वर्ग यहां नर्क यहां, त्रिनेत्र आणि पाप की कमाई या चित्रपटांचा समावेश आहे.

वाढलेल्या वजनामुळे करिअरवर झाला परिणाम
एकीकडे शिल्पाला चांगल्या ऑफर्स येत होत्या तर दुसरीकडे तिचे वाढलेले वजन तिच्या करिअरच्या आड येत होते. पण शिल्पाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. फार कमी लोकांना माहित आहे की, शाहरुख खान आणि मनिषा कोईराला यांच्या 'दिल से' या चित्रपटातील लोकप्रिय 'छैया छैया' गाणे अगोदर शिल्पाच्या नावावर होते. मलायकाच्या जागी शिल्पा या गाण्यात ठुमके लावणार होती पण शिल्पाच्या वाढलेल्या वजनामुळे तिच्या हातातून ती संधी गेली.

NRI बँकरसोबत केले लग्न
11 जुलै 2000 रोजी शिल्पाने यूके येथील बँकर अपरेश रंजीतसोबत लग्न केले. 2003 साली तिने मुलगी अनुष्काला जन्म दिला. 2000 साली लग्न झाल्यावर ती लंडनमध्ये शिफ्ट झाली पण आईवडिलांच्या निधनानंतर ती मुंबईत परतली. शिल्पा शिरोडकरने ऑरेंज ट्री या नावाने प्रॉडक्शन कंपनी सुरु केली आहे. या बॅनरखाली शिल्पाने 'सौ. शशी देवधर' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली.

13 वर्षांच्या ब्रेकनंतर छोट्या पडद्यावर केले होते कमबॅक
शिल्पाने 2013 साली छोट्या पडद्यावरुन अभिनय क्षेत्रात कमबॅक केले होते. 'एक मुठ्ठी आसमान' या मालिकेत तिने महत्त्वाची भूमिका वठवली होती. त्यानंतर तिने स्टार प्लसचा शो 'सिलसिला प्यार का' मध्येही काम केले होते.

विदेशात गेल्यावर कळले शिक्षणाचे महत्त्व
एका मुलाखतीत शिल्पाने सांगितले की, मी दहावी फेल आहे आणि मला त्याचा कधीच पश्च्यात्ताप झाला नाही. मी अगदी सुरुवातीपासूनच शिक्षणात फार कच्ची होते. त्यामुळे मी अॅक्टींग करिअर निवडले. पण विदेशात गेली तेव्हा तिथे शिक्षणाचे महत्तव कळाले. जर मी शिकली असते तर तिथे जॉबही करु शकले असते.

बहीण आहे अभिनेत्री
पूर्वाश्रमीची मिस इंडिया आणि बॉलिवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकर आणि शिल्पा शिरोडकर दोघेही सख्ख्या बहिणी आहेत. नम्रताने साऊथ अभिनेत्यासोबत लग्न केले आहे. नम्रता शिरोडकरची 2000 साली तेलुगु फिल्म ‘वामसी’दरम्यान साऊथ स्टार महेशबाबूसोबत ओळख झाली होती. त्यानंतर एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी फेब्रुवारी 2005 साली विवाह केला. महेशबाबू नम्रतापेक्षा 3 वर्षाने लहान आहे. नम्रता आणि महेश यांना आता दोन मुले आहेत. नम्रता हैदराबाद येथे वास्तव्यास आहे.

बातम्या आणखी आहेत...