आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन भूमिकेच्या निमित्ताने...:'तू तेव्हा तशी'मध्ये साकारतेय शिल्पा साकारणार अनामिका, नव्या मालिकेबद्दल म्हणाली...

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही मालिका 20 मार्च पासून रात्री 8 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

झी मराठीवरील 'तू तेव्हा तशी' या आगामी मालिकेने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला नेली आहे. या मालिकेचा फक्त टीझर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या मालिकेची चर्चा आहे. या मालिकेतून पहिल्यांदाच स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर ही जोडी छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत स्वप्नील सौरभची तर शिल्पा अनामिका दीक्षितची भूमिका साकारणार आहे. 'तू तेव्हा तशी' ही गोष्ट आहे अव्यक्त प्रेमाची. ही मालिका 20 मार्च पासून रात्री 8 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

'तू तेव्हा तशी' या आपल्या नव्या मालिकेबद्दल बोलताना शिल्पा म्हणाली, "मेघ दाटले या मालिकेनंतर जवळपास 20 वर्षांनंतर 'तू तेव्हा तशी'मधून अनामिकाच्या प्रमुख भूमिकेतून मी प्रेक्षकांच्या भेटीला येतेय त्यामुळे खूप जास्त उत्सुकता आहे. मधल्या काळात मी अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये कॅमिओ केले पण पुन्हा एकदा प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येताना खूप आनंद होतोय. स्वप्नील आणि मी याआधी एकत्र काम केलं आहे, पण तू तेव्हा तशी मधून पहिल्यांदांच प्रेक्षक आम्हाला प्रमुख जोडी म्हणून पाहू शकतील. स्वप्नील सोबत खूप वेळानंतर पुन्हा एकदा काम करतेय त्यामुळे एकत्र काम करताना ऑन-स्क्रीन, ऑफस्क्रीन एक पॉझिटिव्ह एनर्जी कायम असते. या मालिकेचं कथानक खूपच वेगळं आणि सुंदर आहे. प्रेमाला वयाचं बंधन नसतं आणि या मालिकेतून ते सुंदररित्या मांडण्यात आलं आहे जे प्रेक्षकांना देखील आवडेल याची मला खात्री आहे."

बातम्या आणखी आहेत...