आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Shilpa's Comeback Film Will Not Be Postponed Due To Raj Kundra's Controversy, The Producer Said 'I Feel Bad Seeing That People Are Dragging Shilpa's Name'

हंगामा 2:राज कुंद्रा कॉन्ट्रोव्हर्सीमुळे शिल्पाचा कमबॅक चित्रपट पुढे ढकलला जाणार नाही, निर्माता म्हणाले- 'या प्रकरणात लोक शिल्पाचे नाव ओढत आहेत हे पाहून वाईट वाटले'

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हंगामा 2 हा चित्रपट 23 जुलैला डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तब्बल 14 वर्षानंतर 'हंगामा 2' या चित्रपटाद्वारे पुनरागमन करत आहे. हा चित्रपट 23 जुलैला डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. शिल्पाच्या कमबॅक चित्रपटाच्या रिलीजच्या काही दिवसांपूर्वीच तिचा नवरा आणि उद्योगपती राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट निर्मितीच्या प्रकरणात अटक झाली आहे. 19 जुलै रोजी गुन्हे शाखेने त्याला अटक केली. दरम्यान, राज कुंद्रा वादाच्या भोव-यात सापडल्याने शिल्पाचा कमबॅक चित्रपट आता पुढे ढकलण्यात येणार असल्याच्या बातम्या चर्चेत होत्या. मात्र निर्माते रतन जैन यांनी या चर्चांना पुर्णविराम लावला आहे.

अलीकडेच न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत 'हंगामा 2'चे निर्माते रतन जैन म्हणाले, 'या सर्व गोष्टींचा 'हंगामा 2'सोबत काय संबंध? शिल्पावर नव्हे तर शिल्पाच्या पतीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ती या चित्रपटातील एक कलाकार आहे आणि तिने प्रमोशन वगळता सर्व कामे पूर्ण केली आहेत. या प्रकरणात शिल्पा शेट्टीची कोणतीही भूमिका नसल्याचेही तपास यंत्रणेने म्हटले आहे, त्यामुळे आमच्या चित्रपटावर त्याचा परिणाम होईल असे मला वाटत नाही. या संपूर्ण प्रकरणात लोक शिल्पाचे नाव ओढत आहेत हे पाहून वाईट वाटते,' असे जैन म्हणाले.

निर्माता रतन जैन पुढे म्हणाले, 'आम्ही एक उत्तम चित्रपट बनवला आहे. लोक हा चित्रपट शिल्पा शेट्टीच्या खासगी आयुष्यात आलेल्या कॉन्ट्रोव्हर्सीमुळे नव्हे तर आशयामुळे पाहतील.'

23 जुलैला डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होत असलेला 'हंगामा 2' हा 2003 मध्ये आलेल्या 'हंगामा'चा सिक्वेल आहे. या चित्रपटात आफताब शिवदासानी, अक्षय खन्ना आणि रिमी सेन यांच्या मुख्य भूमिका होत्या. प्रियदर्शन दिग्दर्शित 'हंगामा 2' मध्ये शिल्पा शेट्टी, परेश रावल, मीजान जाफरी आणि प्रणिता सुभाष मुख्य भूमिकेत आहेत. दुसरीकडे, आशुतोष राणा, राजपाल यादव आणि जॉनी लिव्हर हेदेखील चित्रपटात प्रेक्षकांना हसवताना दिसतील.

बातम्या आणखी आहेत...