आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कंगना रनोटच्या अडचणी वाढणार:कंगनाविरोधात शिवसेनेची ठाण्यात तक्रार, देशद्रोहाचा खटला दाखल होऊ शकतो; बीएमसीने अभिनेत्रीच्या ऑफिसमध्ये बेकायदा बांधकामांची नोटीस चिकटवली

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बीएमसीच्या कारवाईबाबत कंगना म्हणाली- माझ्या अडचणी वाढू शकतात.
  • केंद्र सरकारने कंगना रनोटला Y+ दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे.

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यामुळे अभिनेत्री कंगना रनोटच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कंगनावर टीका केल्यानंतर शिवसेनेच्या आयटी सेलने कंगना विरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच कंगनावर देशद्रोहाचा खटला दाखल करावा, अशी मागणीही केली आहे.

‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, शिवसेनेच्या आयटी सेलने ठाणे जिल्ह्यातील श्रीनगर पोलिस ठाण्यात कंगनाविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यामुळे तिच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असे म्हटले आहे.

दुसरीकडे, बीएमसीने आज कंगनाच्या मुंबईस्थित ऑफिसमध्ये बेकायदा बांधकामांची नोटीस चिकटवली आहे. याबद्दल स्वत: कंगनाने ट्विटद्वारे माहिती दिली. तिने लिहिले, ''सोशल मीडियावरील माझ्या मित्रांनी बीएमसी विरोधात संताप व्यक्त केला होता म्हणून त्यांनी आज बुलडोझर आणला नाही. परंतु, ऑफिसमध्ये नोटीस चिकटवली आहे. मित्रांनो येणारे दिवस माझ्यासाठी खूप धोकादायक असू शकतात, परंतु आपले प्रेम आणि समर्थन मिळत आहे.''

  • कंगनाला 14 दिवस क्वारंटाइन केले जाईल

कंगना रनोट ही येत्या 9 सप्टेंबरला मुंबईत येणार आहे. केंद्र सरकारकडून मिळालेल्या Y+ सिक्युरिटीत ती मुंबईत दाखल होणार आहे. कंगना मुंबईत आल्यानंतर तिला नियमानुसार होम क्वारंटाईन केले जाईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

“येत्या बुधवारी (9 सप्टेंबर) कंगना रनोट ही हिमाचल प्रदेशातून मुंबईत येणार आहे. त्यामुळे परराज्यातून आलेल्या व्यक्तीला नियमानुसार होम क्वारंटाइन केले जाते. त्यामुळे नियमानुसार कंगनाच्या हातावरही विमानतळावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारला जाणार आहे”, असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

  • सोमवारी कंगनाच्या ऑफिसवर छापा टाकण्यात आला

कंगनाने अलीकडेच एका ट्विटमध्ये मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. तेव्हापासून शिवसेना तिला लक्ष्य करीत आहे. शिवसेनेने आपल्याला धमकावल्याचा आरोप करत कंगनाने गेल्या आठवड्यात एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. सोमवारी केंद्र सरकारने तिला वाय श्रेणीची सुरक्षा दिली. त्यानंतर बीएमसीने कंगनाच्या मुंबईस्थित प्रॉडक्शन कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकला होता.