आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात क्यूट कपल असलेलले दीपिका कक्कर आणि अभिनेता शोएब इब्राहिम आईबाबा होणार आहेत. दीपिका गर्भवती असल्याचे समोर आले आहे. दीपिका गर्भवती राहण्याची ही पहिली वेळ नाही. तर गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये दीपिकाचा गर्भपात झाला होता, असे शोएबने सांगितले आहे.
शोएब म्हणाला की, तो काळ आम्हा दोघांसाठी खूप भीतीदायक होता. त्यामुळे यावेळी आम्ही ही बातमी खूप उशिरा सगळ्यांसमोर आणली. शोएबच्या म्हणण्यानुसार, गर्भपात झाल्यामुळे दीपिकाच्या तब्येतीवर वाईट परिणाम झाला आणि त्यामुळे ती खूप जाड झाली.
गर्भपात झाल्यामुळे आम्ही घाबरलो
शोएबने मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'यावेळी दीपिकाच्या गर्भपातामुळे आम्ही थोडे घाबरलो होतो आणि मला माहित आहे की तुम्हाला हे समजेल, कारण हे केवळ आमच्यासोबतच नाही तर अनेक लोकांसोबत घडले आहे. आम्ही इतके घाबरलो होतो की हे आनंदाचे क्षण साजरे करतानाही काही संकोच वाटत होता.
शोएब आणि दीपिका यांनी म्हटले आहे की, 'कृतज्ञता, आनंद, उत्साह आणि थोड्या अस्वस्थतेने आम्ही ही बातमी तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहोत. आम्ही लवकरच पालक होणार आहोत. आमच्या बाळाला तुमच्या प्रार्थना आणि प्रेमाची गरज आहे. या कॅप्शनसोबत दीपिका आणि शोएबने मॉम आणि डॅड लिहिलेली कॅपही घातली आहे.
लग्नाच्या 5 वर्षांनंतर हे जोडपे पालक बनणार
शोएब इब्राहिम आणि दीपिका कक्कर यांनी 22 फेब्रुवारी 2018 रोजी लग्न केले. लग्नानंतर दीपिकाने इस्लाम धर्म स्वीकारला होता. लग्नाच्या पाच वर्षानंतर दीपिका आई होणार आहे. दीपिकाचे हे दुसरे लग्न आहे, याआधी दीपिकाचे लग्न रौनक गुप्ता नावाच्या व्यक्तीसोबत झाले होते. रिपोर्ट्सनुसार, दीपिका आणि रौनकमध्ये सर्व काही ठीक नव्हते, त्यामुळे हे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही.
'ससुराल सिमर का'च्या सेटपासून प्रेमाला सुरुवात
दीपिका आणि शोएबची प्रेमकहाणी 'ससुराल सिमर का'च्या सेटवर सुरू झाली. या शोमध्ये शोएबने दीपिकीच्या ऑनस्क्रीन पतीची भूमिका साकारली होती आणि ते खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दीपिका ससुराल सिमर व्यतिरिक्त ती बिग बॉस 14 ची विजेती देखील आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.