आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोलेच्या रिलीजची 45 वर्षे:पहिल्याच दिवशी झाला होता शूटिंगला उशीर, ट्रेन सिक्वेंसच्या चित्रीकरणासाठी सिप्पी यांनी दिले लंगर, वाचा 'शोले'च्या रंजक गोष्टी

एका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • या चित्रपटाची प्रदर्शनाची खरी तारीख 14 ऑगस्ट 1975 ही आहे.

शोले... एक अभिजात चित्रपट...ज्यातील आश्चर्यकारक अॅक्शन, उत्कृष्ट अभिनय, उत्तम संगीत, दिग्दर्शन आणि संवाद आउट ऑफ वर्ल्ड... इतका खोलवर परिणाम की लोकांना या चित्रपटातील एक-एक दृश्य, एक-एक संवाद तोंडपाठ आहे... सर्वांत जास्त चाललेला, सर्वांत जास्त कमाई करणारा ‘शोले’हा चित्रपट होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आग लावली होती. या चित्रपटाच्या रिलीजला आज 45 वर्षे पूर्ण झाली आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी सांगितल्यानुसार, या चित्रपटाची प्रदर्शनाची खरी तारीख 14 ऑगस्ट 1975 ही आहे. कारण यादिवशी हा चित्रपट मुंबईतील मिनरवा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 15 ऑगस्ट रोजी देशातील इतर ठिकाणी हा रिलीज करण्यात आला होता. सिप्पी यांनी सांगितल्यानुसार, आजप्रमाणे चित्रपट पुर्वी एकाच दिवशी संपूर्ण भारतात प्रदर्शित होत नव्हता. टेरेटरीनुसार तो प्रदर्शित केला जायचा. तेव्हा ऑगस्टमध्ये हा चित्रपट मुंबई, बंगाल आणि हैदराबाद या सेंटर्सवर रिलीज झाला होता. मग दिल्ली आणि इतर ठिकाणी दिवाळीत तो रिलीज करण्यात आला होता.

‘शोले’ चित्रपटात एक पोलिस अधिकारी, कुख्यात दरोडेखोर, रामगड गाव आणि छोटे-मोठे गुन्हेगार यावर आधािरत कथानक होते. दराेडेखाेर गब्बरच्या दहशतीमुळे रामगडवासी त्रस्त आहेत आणि पोलिस अधिकारी ठाकूर बलदेव सिंह त्याच्या दहशतीचा शेवट करण्याची तयारी करत आहेत. ठाकूर बलदेव, गब्बरला अटक करतात आिण येथूनच सुरू होते वैयक्तिक शत्रूत्व. गब्बर जेेलमधून सुटल्यानंतर ठाकूर यांच्या संपूर्ण कुटुंबाला त्यांच्या अनुपस्थित मारून टाकतो. याचा बदला घेण्यासाठी आणि गब्बरच्या दहशतीपासून रामगडवासीयांना वाचवण्यासाठी पुन्हा एकदा ते गब्बरशी दोन हात करतात, परंतु गब्बर त्यांचे दोन्ही हात कापून त्यांना सोडून देतो. काही वर्षांनंतर ठाकूर छोटे-मोठे गुन्हे करणाऱ्या दोन युवकांना घेऊन (ज्यांना त्यांनी काही वर्षांपूर्वी अटक केलेली असते आणि एका हल्ल्यादरम्यान त्यांची हिंमत आणि ताकद पाहिलेली असते.) गब्बरला जिवंत पकडण्याच्या मोहिमेच्या तयारीला लागतात.

 • कशी आली होती ‘शोले’ची कल्पना

‘शोले’चा बेसिक प्लॉट तसे पाहिले तर अकीरा कुरोसावा यांच्या ‘सेव्हन समुराई’ चित्रपटातून घेतला आहे. यातील व्हिज्युअल स्टाइल इटालियन चित्रपटनिर्माता सर्जिओ लियोन यांच्या चित्रपटातून घेतली आहे. चित्रपटातील सीक्वंेस हॉलिवूडचे क्लासिक चित्रपट ‘वन्स अपॉन ए टाइम इन द वेस्ट’, ‘द प्रोफेशनल’, ‘वन-आइड जॅक्स’ आणि ‘गार्डन ऑफ एव्हिल’ यातून प्रेरित आहेत. ‘जंजीर’ चित्रपट प्रदर्शित होऊन सहा महिने उलटले होते. सलीम जावेद यांना ‘शोले’ची कल्पना सुचली. ते रमेश सिप्पी यांना भेटले आणि त्यांना चार ओळींत कथानक सांगितले. यापूर्वी त्यांनी मनमोहन देसाई आणि प्रकाश मेहरा यांना कथानक सांगितले होते. दोघांनीही स्क्रिप्ट आणि संवादातील जास्तीत जास्त भाग उर्दूत लिहिला होता. या चित्रपटाला पूर्वी ‘अंगारे’हे शीर्षक द्यावे असे ठरले होते. नंतर अर्ध्यापेक्षा जास्त चित्रपट तयार झाला त्यावेळी याला ‘शोले’ शीर्षक देण्यात आले.

 • रामगड गावाची कथा आणि ‘सिप्पीनगर’

निर्माता जीपी सिप्पी हे काहीतरी अफलातून करण्याच्या विचारात होते. त्यांनी मुलगा रमेश सिप्पी यांना सांगितले, कितीही पैसा खर्च होऊ दे, परंतु लोकेशन असे निवड जे अगदी वेगळे असेल. रमेश सिप्पी यांनी लोकेशन शोधण्याची जबाबदारी कला दिग्दर्शक राम येडेकर यांच्यावर सोपवली. येडेकर यांना बंगरुळूजवळ चारही बाजूंनी पर्वतांनी वेढलेली एक जागा सापडली. त्यांनी त्वरीत सिप्पी यांना लोकेशनबाबत सांगितले. सिप्पी, सिनेमाटोग्राफर द्वारका दिवेचा यांना घेऊन तेथे पोहोचले. या जागेचे नाव रामनगरम‌ होते. हे एक छोटेसे खेडे होते. काही दिवसांत येथे सिप्पी यांनी एक टाकी, वाडा, मंदिर-मशीद तयार केले. रस्ते सोडून बाकी सर्व सेट होता. चित्रीकरणानंतर गावात तयार करण्यात आलेल्या सेटला सिप्पी यांनी तोडून टाकले आणि महागड्या वस्तूंचा लिलाव केला. गावातील एका भागाला काही काळापुरता ‘सिप्पीनगर’ नावदेखील देण्यात आले होते.

 • गब्बरसिंगचे पात्र निर्माण होण्यामागील किस्सा

गब्बरसिंग पात्राचे नाव हे खऱ्या दरोडेखाेराचेच घेतले होते. दरोडेखोर बनण्यामागे कोणतीच कथा नसावी, ज्याचा उद्देश फक्त दरोडेखाेरी आणि दहशत निर्माण करायची असा असावा. सलीम-जावेद यांना असे पात्र चित्रपटात चित्रीत करायचे होते. दरोडेखोराचे पात्र पूर्वी बऱ्याच चित्रपटांत दाखवले गेले होते म्हणून त्यांनी या चित्रपटासाठी खलनायक म्हणून एका युनिक दरोडेखोराचे पात्र लिहिले. काही वर्षांपूर्वी सलीम-जावेद यांनी अमजद खान यांना एका नाटकात काम करताना पाहिले होते. अमजद यांचा अभिनय पाहिला असल्यामुळे यात त्यांना संधी द्यावी असा विचार केला. त्यांनी अमजद यांना बोलावले आणि म्हणाले ही भूमिका तुमचे नशीब बदलू शकते. अमजद तयार झाले आणि काही दिवसांनंतर दाढी वाढवून, दातांना काळे करून सलीम-जावेद यांच्याकडे आले. त्यांची एक स्क्रीन टेस्ट घेण्यात आली. त्यांचा पहिलाच शॉट इतका उत्कृष्ट झाला की, या चित्रपटात यांचेच नाणे खणखणीत वाजणार असे स्पष्ट दिसून आले.

 • सलीम-जावेद सोबत झाला अमजद यांचा वाद

अमजद खान ‘शोले’च्या चित्रीकरणादरम्यान त्याच गेटअपमध्ये राहायचे आणि संपल्यांनतरही सेटवर त्याच लूकमध्ये राहायचे. अमजद बऱ्याचदा आपला शॉट रिटेक करायचे यामुळे युनिट नाराज होते. हळूहळू युनिटमध्ये कुजबूज होऊ लागली की, रमेश सिप्पी यांनी अमजद खान यांना घेऊन चूक केली आहे. कुजबुज इतकी वाढली की, सलीम खान आणि जावेद अख्तर यांनी अमजद यांची निवड केली असल्यामुळे त्यांनाही याकडे कानाडोळा करणे अशक्य झाले. ते रमेश सिप्पी यांना म्हणाले जर तुम्हाला अमजद आवडत नसेल तर त्याला बदलून टाकू. काही दिवसांनंतर अमजद यांना हे समजले, ते खूप निराश झाले आणि या घटनेमुळे त्यांच्यात आणि सलीम-जावेदमध्ये वाद निर्माण झाले. त्यांनी सलीम-जावेदसोबत पुन्हा कधीच काम केले नाही.

 • अशी निश्चित झाली पात्रांची नावे आणि चित्रपटात त्यांची एंट्री

सलीम खान यांनी त्यांचे कॉलेज मित्र वीरेंद्र सिंह व्यास आणि जय सिंह राव कलेवर यांच्या नावावरून जय-वीरू हे नाव ठेवले होते. ठाकूर बलदेव सिंह यांचे नाव त्यांनी त्यांच्या सासऱ्याच्या नावावरून घेतले होते. चित्रपटासाठी अमिताभ यांची पूर्वीपासून निवड करण्यात आली होती. सिप्पी यांनी ठाकूरच्या भूमिकेसाठी अगोदर दिलीप कुमार आणि प्राण यांच्याबाबत विचार केला होता. नंतर संजीव कुमार बोर्डवर आलेत, परंतु त्यांना गब्बरची भूमिका साकाराची होती. नंतर ते ठाकूरच्या भूमिकेसाठी तयार झाले. धर्मेद्र यांना संजीव यांची भूमिका करायची होती, परंतु त्यांना असे वाटले की, ठाकूर झालो तर संजीव यांना वीरूची भूमिका मिळेल आणि त्यांना हेमामालिनीसोबत रोमान्स करण्याची संधीही मिळेल. म्हणून धर्मेंद्र यांनी ठाकूरचा नाद सोडला.

 • पहिल्याच दिवशी आला पाऊस, चित्रीकरणाला झाला उशीर

‘शोले’ 15 ऑगस्ट 1975 रोजी प्रदर्शित झाला होतो. दाेन वर्षांपूर्वी 2 ऑक्टोबर 1973 रोजी याच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. रामनगरम‌मध्ये सर्व अभिनेते पोहोचले, परंतु चित्रीकरण सुरू होण्यापूर्वीच पावसाला सुरुवात झाली आणि चित्रीकरणाच्या आनंदावर पाणी पडले. त्यांनतर पहिले दृश्य जय आणि राधावर चित्रीत केले गेले. ज्यात जय राधाला तिजोरीच्या किल्ल्या देतो. सिप्पी यांनी चित्रपटातील बरेच दृश्य पुन्हा चित्रीत केले होते. ‘ये दोस्ती’ गाणे चित्रीत करण्यासाठी 21 दिवस लागले होते. तर राधा ज्या दृश्यात दिवा लावते ते दृश्य विजेच्या समस्येमुळे चित्रीत करायला 20 दिवस लागले होते. रेल्वेमधील चोरीचे दृश्य, जे मुंबई-पुणे रेल्वे रुटवर पनवेलजवळ चित्रीत केले होते ते पूर्ण होण्यासाठी जवळपास 7 आठवड्यांपेक्षा अधिक काळ लागला होता.

 • ट्रेन सिक्वेंसच्या चित्रीकरणासाठी सिप्पी यांनी दिले लंगर

चित्रीकरणादरम्यान निर्मात्यांना ट्रेनचा सिक्वेंस चित्रीत करण्यासाठी खूप अडचणी आल्या. रेल्वेच्या नियमाप्रमाणे एका वेळी एका रुळावर दोन ट्रेन चालवल्या जाऊ शकत नव्हत्या. त्यामुळे युनिटला हे दृश्य चित्रीत करण्यासाठी बऱ्याच भागांमध्ये काम करावे लागले. सकाळची लोकल येण्यापूर्वी आणि संध्याकाळची लोकल येण्यापूर्वी पाच वाजेनंतर ट्रॅक रिकामे करून द्यावे लागायचे. याचा परिणाम असा व्हायचा की संपूर्ण दिवस चित्रीकरणाच्या नावावर काहीच दृश्य चित्रीत करता यायची. त्यानंतर सिप्पी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी लंगरची व्यवस्था केली होती. पुढे हा लंगर गावातील लोकांसाठी सुरू ठेवावा लागला होता.

 • चित्रपटातील बऱ्याच दृश्यांवर सेन्सारने घेतला होता आक्षेप

पूर्वी ‘शोले’ची जी स्क्रिप्ट लिहिली होती त्यात शेवटी ठाकूर गब्बरला मारतो असे होते. याशिवाय अशी बरीच दृश्य होती जी प्रदर्शित झालेल्या चित्रपटात घेतली नाहीत. याशिवाय यात इमामच्या मुलाची गब्बरकडून हत्या आणि ठाकूर कुटुंबातील सर्व सदस्यांना गोळी घालण्याच्या दृश्याचाही समावेश होता. सेन्साॅर बोर्डने बऱ्याच दृश्यांवर आक्षेप घेत दृश्य काढून टाकली होती. नंतर सिप्पी यांनी सेन्साॅर बोर्डसोबत खूप भांडण केल्यानंतर गब्बरच्या मृत्यूचे दृश्य बदलले होते. 1990 मध्ये या चित्रपटाची मूळ आवृत्ती इंग्रजीत प्रसिद्ध करण्यात आली.

 • लग्नाबाबत बोलणीचे दृश्य खऱ्या आयुष्यातून घेतले

चित्रपटात बसंतीच्या मावशीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री लीला मिश्रा यांच्याकडे जय (अमिताभ) आपला मित्र वीरू (धर्मेंद्र)च्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन जातो. हे दृश्य खूप गाजले होते. हे दृश्य सलीम-जावेद यांच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रेरणेतून घेतले होते. जावेद यांनी हनी ईराणी यांच्यासोबत लग्न करण्याचा प्रस्ताव सलीम यांच्याकरवी पाठवला होता. आणि त्यावेळी ते हनीच्या आईला म्हणाले होते, ‘जावेेद माझा पार्टनर आहे. मी अशा कुणासोबतच काम करत नाही जे मला आवडत नाही. तेथे त्यांनी खूपच नाट्यमयरीत्या जावेद यांच्या लग्नाबाबत बोलणी केली होती. याच कल्पनेचा नंतर चित्रपटात दमदार पद्धतीने वापर केला गेला.

 • संवादापासून पात्रांपर्यंत सर्व झाले अविस्मरणीय

‘शोले’तील प्रत्येक पात्र आज अविस्मरणीय झाले आहे. मग ते मुख्य पात्र जय, वीरू, ठाकूर, गब्बर, राधा, बसंती, इमाम साहब, सांभा, सूरमा भोपाली, जेलर, रामलाल, कालिया असो वा मावशी. प्रत्येक पात्रांचे एक वैशिष्टय होते. आिण ते साकारण्यामागे सलीम-जावेद यांचे जादूई विचार होते. कलाकारांच्या अभिनयाने ज्याप्रमाणे हा चित्रपट लोकप्रिय झाला त्याप्रमाणेच चित्रपटातील एक-एक संवाददेखील तेवढाच कारणीभूत आहे. गब्बरसाठी लिहिलेले संवाद हे जबरदस्त होते. जसे -कितने आदमी थे...वो दो थे और तुम तीन फिर भी खाली हाथ लौट आए...अब गोली खा..., जो डर गया समझो मर गया, ये हाथ हमको दे दे ठाकूर. त्याप्रमाणेच ठाकूरसाठीदेखील दमदार संवाद होते....ये हाथ नहीं फांसी का फंदा है.. लोहा लोहे को काटता है..., कीमत जो तुम चाहो, काम जो मैं चाहूं...।

बातम्या आणखी आहेत...