आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड अभिनेता काळाच्या पडद्याआड:अभिनेत्री शोमा आनंद यांचे पती तारिक शाह यांचे निधन, 'बहार आने तक' सारख्या चित्रपटाचे होते अभिनेता आणि दिग्दर्शक

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तारिक यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दिग्गज चित्रपट अभिनेते आणि दिग्दर्शक तारिक शाह यांचे निधन झाले आहे. शनिवारी सकाळी त्यांनी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. तारिक हे अभिनेत्री शोमा आनंद यांचे पती होते. तारिक आणि शोमा यांना सारा नावाची एक मुलगी आहे. वृत्तानुसार, ते किडनीच्या आजाराने ग्रस्त होते आणि गेल्या दोन वर्षांपासून डायलिसिसवर होते.

'बहार आने तक' सारख्या चित्रपटात केले होते काम
तारिक यांना 'बहार आने तक' (1990), 'महात्मा' (1997) आणि 'मुंबई सेंट्रल' (2016) या सारख्या चित्रपटांसाठी ओळखले जातो. त्यांनी 'जन्म कुंडली' (1995), 'बहार आने तक' या चित्रपटांच्या दिग्दर्शनाची धुरादेखील सांभाळली होती. या व्यतिरिक्त ते 'कडवा सच' या टीव्ही सीरियलचे दिग्दर्शक आणि निर्माता देखील होते.

दिलीप कुमार यांच्यासोबत झळकणार होते
आयएमडीबीच्या रिपोर्टनुसार, 1984 मध्ये दिलीप कुमार 'सत्या' या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती करण्याची योजना आखत होते. यात दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्यासह तारिक शाह काम करणार होते. सुरुवातीला हा चित्रपट पोस्टपोन झाला आणि नंतर थंड बस्त्यात गेला. याच रिपोर्टनुसार तारिक यांनी 'मोहब्बत जिंदा रहती है' (1981), 'अव्वल नंबरी' (1982) आणि 'करवट' (1988) सारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते, मात्र हे चित्रपट प्रदर्शितच झाले नाहीत.

बातम्या आणखी आहेत...