आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शूटर दादी काळाच्या पडद्याआड:चंद्रो तोमर यांचे कोरोनामुळे निधन, 'सांड की आंख'च्या अभिनेत्री तापसी आणि भूमीने वाहिली श्रद्धांजली

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चंद्रो तोमर यांच्या आयुष्यावर आधारीत 'सांड की आँख' नावाचा एक बॉलिवूड चित्रपटही बनवण्यात आला आहे.

शूटर दादी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चंद्रो तोमर यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. श्वसनाचा त्रास झाल्याने त्यांना मेरठ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोना संक्रमणातच 'ब्रेन हॅमरेज'मुळे चंद्रो तोमर यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून मिळतेय.

89 वर्षीय चंद्रो यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी तीन दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर दिली होती. त्यांच्याच आयुष्यावर 'सांड की आंख' हा चित्रपट आला होता. या चित्रपटातील अभिनेत्री तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर यांनी शोक व्यक्त करत त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.

'सांड की आंख' चित्रपटात दाखवण्यात आला होता दादींचा संघर्ष

चंद्रो तोमर यांचा जन्म मुजफ्फरनगरमध्ये झाला होता. त्यांनी निशानेबाजीला सुरुवात केली तेव्हा त्यांचे वय 60 वर्ष होते. जगातील सर्वात वयोवृद्ध निशानेबाज म्हणून त्यांना ओळखले जाते. परंतु, यानंतरही त्यांनी अनेक स्पर्धांत भाग घेत आपल्या कौशल्य दाखवले. यांच्या आयुष्यावर आधारीत 'सांड की आँख' हा बॉलिवूड चित्रपट बनवण्यात आला आहे. चित्रपटात भूमी पेडणेकर हिने चंद्रो तोमरची भूमिका साकारली होती. उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यातील जोहरी खेड्यातील रहिवासी चंद्रो तोमर यांना 6 मुले आणि 15 नातवंडे आहेत. यापैकीच एक नात शेफालीला त्या डॉ. राजपाल यांच्या शूटिंग अकॅडमीत घेऊन गेल्या होत्या. येथे त्यांनी ट्रेनरच्या सांगण्यावरुन नेमबाजीला सुरुवात केली होती.

'सांड की आंख' या चित्रपटात चंद्रो यांच्या नणंद प्रकाशीची व्यक्तिरेखा तापसी पन्नूने साकारली होती. प्रकाशी यांनी चंद्रो यांना बघून नेमबाजी शिकायला सुरुवात केली होती.

भूमीने फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन वाहिली श्रद्धांजली

भूमीने लिहिले- 'शूटर दादी चंद्रो यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे. खरं सांगायचं तर जणू माझा आणि कुटूंबाचा एक भाग निघून गेला आहे. मी खूप भाग्यवान आहे की मला त्यांचे आयुष्य पडद्यावर जगण्याची संधी मिळाली. ज्यांनी मला जीवनाबद्दल आणि एक स्त्री म्हणून बरेच काही शिकवले.'

वयाच्या 60 व्या वर्षी नेमबाजीला केली होती सुरुवात
वयाच्या 60 व्या वर्षी नेमबीजाचा सराव सुरू केल्यानंतर चंद्रो यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी 25 राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भाग घेतला आणि सर्व स्पर्धा जिंकल्या. सुरुवातीच्या काळात चंद्रो सराव करण्यासाठी रात्रीची वेळ निवडत असे. दिवसभर काम करून प्रत्येकजण जेव्हा रात्री झोपायचा तेव्हा त्या पाण्याने भरलेला जग घेऊन तासनतास गन होल्डिंगचा सराव करायच्या.

बातम्या आणखी आहेत...