आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजवळपास तीन महिन्यांपर्यंत लॉकडाऊनने कोरोनाव्हायरसशी झुंज दिल्यानंतर भारत अखेर न्यू नॉर्मलचा स्वीकार करीत आहे. अनलॉक टप्पा सुरू झाला आहे आणि करमणुकीच्या उद्योगाने कार्य करण्याचा हा नवीन मार्ग स्वीकारण्यास सुरूवात केली आहे. झी युवा वाहिनीवरील वरील प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांचे शूट पुन्हा सुरू झाले आहे. सेटवर सामाजिक अंतर आणि कमीतकमी कर्मचार्यांसह मार्गदर्शक सूचनांचे अत्यंत काळजीपूर्वक पालन केले जात आहे.
ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण, डॉक्टर डॉन आणि प्रेम पॉयजन पंगा, वैजू नंबर 1 या मालिकांचं शूटिंग आता सुरु झालं आहे. कलाकार देखील जवळपास ३ महिन्यांनंतर पुन्हा कामला सुरुवात करत असल्यामुळे उत्सुक आहेत. मात्र शूटिंग करताना सर्व खबरदारी बाळगली जाते आहे.
कलाकारांच्या खोल्या, मेकअप रूम्स, स्वच्छतागृहे एवढेच नाही तर, चित्रीकरण केले जात असलेला संपूर्ण परिसर योग्यप्रकारे निर्जंतुक केला जात आहे. चित्रीकरण आणि निर्जंतुकीकरण या दोन्ही कामांचा भन्नाट वेग सेटवर पाहायला मिळतो आहे.
याबद्दल बोलताना 'प्रेम पॉयजन पंगा' या मालिकेचे निर्माते आदिनाथ कोठारे म्हणाले, "चित्रीकरण जरी सुरु झालं असलं तरी आम्ही सेटवर योग्य ती खबरदारी घेतोय. कोरोनापासून वाचण्यासाठी सर्व नियम आणि अटींचं पालन करतोय, तसंच आम्ही सर्व युनिट मेम्बर्सना पीपीइ किट्स दिले आहेत. याचसोबत सेटवर 24तास मेडिकल हेल्प आणि एक रुग्णवाहिका देखील आहे."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.