आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मल्टिस्टारर सिनेमा:डलहौसीमध्ये सुरु होणार 'भूत पुलिस'चे शूटिंग, 4 नोव्हेंबरचा मुहूर्त; 45 दिवसांच्या शेड्यूलमध्ये शूटिंग संपेपर्यंत स्टार्स करतील काम

अमित कर्ण, मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या चित्रपटात आता जॅकलिन फर्नांडिसची एन्ट्री झाली आहे.

सैफ अली खान, अर्जुन कपूर आणि यामी गौतम स्टारर 'भूत पुलिस' या चित्रपटात आता जॅकलिन फर्नांडिसची एन्ट्री झाली आहे. ती पुढच्या महिन्याच्या 4 तारखेपासून डलहौसीमध्ये याचे शूटिंग सुरु करणार आहे. ती सैफ, अर्जुन, यामी आणि इतर कलाकारांसोबत तेथे जाणार आहे. चित्रपटाचे निर्माते रमेश तौरानी यांनी याला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले, चित्रपटातील कलाकार आणि क्रू डलहौसीला जात आहेत. तेथे आमचे 45 दिवसांचे शूटिंग ठेवण्यात आले आहे. तेथे आम्ही शूटिंग संपेपर्यंत काम करणार आहोत. यात जॅकलिन एका वेगळ्याच रुपात दिसणार आहे.

ही असेल कथा
चित्रपटाच्या एका सूत्रांनी सांगितले, यात यामी आणि जॅकलिन बहिणीच्या भूमिकेत आहेत. यामीचा खून होतो आणि जॅकलिन ते रहस्य उघड करते. यात तिची मदत सैफ आणि अर्जुनचे पात्र करतात. मृत्यूनंतर यामीच्या पात्राची आत्मा जॅकलिनची मत करत. अर्जुन आणि सैफ यात भूत पकडणा-या पोलिस दलात काम करत असतात.

आधीच रिलीज झाले होते पोस्टर

पूर्वी या चित्रपटात सैफसह अली फजल आणि फातिमाला फायनल करण्यात आले होते. नंतर स्टारकास्ट बदलण्यात आली.
पूर्वी या चित्रपटात सैफसह अली फजल आणि फातिमाला फायनल करण्यात आले होते. नंतर स्टारकास्ट बदलण्यात आली.

या चित्रपटाची घोषणा मागील वर्षी करण्यात आली होती. त्यात सैफ अली खान, अली फजल आणि फातिमा सना शेख यांना घेण्यात आले होते. अली आणि फातिमा यांना नंतर काही कारणाने चित्रपटातून वगळण्यात आले. त्यांच्या जागी अर्जुन आणि यामी यांना घेण्यात आले. आता त्यात जॅकलिनची एन्ट्री झाली आहे. विशेष म्हणजे जुन्या कलाकारांसह या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टरही रिलीज करण्यात आले होते.

'सर्कस'मध्येही दिसणार जॅकलिन

'सर्कस' या चित्रपटाची अलीकडेच घोषणा करण्यात आली. यात रणवीरसह जॅकलिन झळकणार आहे.
'सर्कस' या चित्रपटाची अलीकडेच घोषणा करण्यात आली. यात रणवीरसह जॅकलिन झळकणार आहे.

'भूत पुलिस' या चित्रपटाव्यतिरिक्त जॅकलिन रोहित शेट्टीच्या 'सर्कस'मध्येही रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. सूत्रांनी सांगितले, चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शन येत्या आठवड्यापासून सुरु होणार आहे. 4 नोव्हेंबर रोजी डलहौसीला जाण्यापूर्वी जॅकलिन याचे वाचन सत्र पूर्ण करणार आहे. यात ती 'अंगूर'मधील मौसमी चॅटर्जी यांची भूमिका मॉर्डन रोलमध्ये सादर करणार आहे. या दोघांव्यतिरिक्त जुन्या 'अर्थ'च्या रिमेक मध्येही जॅकलिन असल्याची बातमी आहे. मात्र आता त्यात काही बदल करण्यात आला आहे. त्याचे निर्माते चेन्नईमध्ये शूटिंग करणार आहेत. दक्षिणेची रेवती याचे दिग्दर्शन करणार आहे. जॅकलिनच्या तारखांमुळे सध्या गोंधळ उडाला आहे. त्यामुळे तिच्या जागी दुस-या कुणालाही घेतले जाऊ शकते.

रकुलसोबत शूटिंग करतोय अर्जुन
दुसरीकडे अर्जुन कपूर सध्या निखिल आडवाणीच्या बॅनरच्या चित्रपटात रकुल प्रीत सिंगसोबत काम करत आहे. मध्यंतरी त्याला कोरोना झाला होता. पण आता तो कामावर परतला आहे. तोही या महिन्याच्या अखेरीस हा चित्रपट पूर्ण करुन 4 नोव्हेंबरपासून डलहौसीमध्ये शूटिंग करणार असल्याचे ऐकिवात आहे.