आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊनमधील पहिली शूटिंग:अवघ्या तीन तासांत पूर्ण झाली अक्षय कुमारच्या शॉर्ट फिल्मची शूटिंग, सावधगिरी बाळगत निवडक लोकांनी सांभाळले संपूर्ण काम 

मुंबई (अमित कर्ण)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कुठलाही सपोर्ट स्टाफ सेटवर आणला नाही, आपल्या घरुन अक्षय स्वतः गाडी चालवत आला
  • एकाच कॉश्च्युममध्ये केली पूर्ण शूटिंग, वेळ असा मॅनेज केला जेणेकरून सेटवर जेवणाची व्यवस्था करण्याची आवश्यकता भासली नाही.

आर बाल्की यांच्या दिग्दर्शनात अक्षय कुमारने लॉकडाऊनच्या काळात एका शॉर्ट फिल्मची शूटिंग पूर्ण केली आहे. या चित्रीकरणासाठी 22 आणि 23 मे या दोन दिवसांसाठी परवानगी घेण्यात आली होती. पण अखेर 25 मे रोजी कमालिस्तान स्टुडिओत चित्रीकरण पूर्ण झाले. तेथे चित्रीकरण कसे झाले, किती क्रू मेंबर्स यावेळी हजर होते, याची आतील माहिती दिव्य मराठीला मिळाली आहे. सामाजिक संदेश देणा-या या शॉर्ट फिल्मची निर्मिती अनिल नायडू यांनी केली आहे. त्यांनी यापूर्वी बाल्की आणि अक्षय कुमारसोबत विविध प्रोजेक्टची निर्मिती केली आहे.   अनिल नायडू यांनी दिव्य मराठीसोबत खास बातचीत करताना या शॉर्ट फिल्मच्या मेकिंगची माहिती शेअर केली. ते म्हणाले, 'मंत्रालयाने यासाठी प्रथम अक्षय कुमार आणि आर बाल्की यांच्यासोबत संपर्क साधला. त्यानंतर या शॉर्ट फिल्मसाठी स्क्रिप्ट तयार केली गेली. त्यानंतर आम्ही मंत्रालयाला सांगितले की, आम्हाला शूटिंगसाठी परवानगी हवी.  तर त्यांनी स्वत: मुंबई पोलिस आयुक्तांकडून परवानगी मागितली. खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही 22 आणि 23 मे रोजी शूटिंगसाठी परवानगी मागितली होती. पण अखेर शूटिंग 25 मे रोजी झाले. आम्ही ही शूटिंग केवळ अडीच ते 3 तासांत पूर्ण केली. सामान्यत: लॉकडाऊनपूर्वी सेटवर 60 ते 70 क्रू मेंबर्स असायचे, तर आम्ही फक्त 20 क्रू मेंबर्ससोबत शूट केले. अक्षय कुमार स्वत: गाडी चालवत सेटवर आला होता.  सेटवर फक्त मेकअप मॅन होता आणि दुसरे क्रू मेंबर्स नव्हते. त्याचप्रमाणे सिनेमॅटोग्राफरदेखील एका कॅमेरा सहाय्यकासह आले. मी स्वत: सेटवर येताना बाल्की सरांना घ्यायला गेलो होतो.  बाल्की सर यांच्यासोबतही खूप कमी असिस्टंट डायरेक्टर होते. संपूर्ण शूट दरम्यान कॉश्च्युम बदलण्यात आला नाही. शूटिंगच्या आदल्या दिवशी आम्ही अक्षयला कपडे पाठवले होते. त्याच कपड्यात तो सेटवर आला होता.

  सेटवर आम्ही एक डिसइन्फेक्ट करणारा टनल बसवला होता. त्याच्या माध्यमातूनच सेटवर येण्याची परवानगी देण्यात आली होती. या टनलमधून प्रवेश करताना एक शॉवर तुमच्या कपड्यांसह संपूर्ण शरीर डिसइन्फेक्ट करते. शिवाय सॅनिटाइजर्सही उपलब्ध होते. फेस शील्ड, ग्लोव्ह्ज, मास्क देण्यात आले होते. 

सगळ्यांचा कॉल टाइम सकाळी 7:00 वाजता होता आणि आम्ही 3 तासांनी म्हणजे सकाळी 10 वाजता पॅक अप केले. जिथे जिथे क्रू कमी करता येईल त्या त्या ठिकाणी तो कमी केला.  सेटवर फक्त महत्त्वाच्या क्रूला बोलवण्यात आले. ड्रायव्हर हेल्पर, स्पॉट बॉय हे सर्व सपोर्ट ग्रुपमध्ये येतात. त्यांचा शूटिंगशी थेट संबंध नसतो, परंतु सेटवर मॅन पॉवरची संख्या वाढते. सध्याच्या परिस्थितीत फारशी गर्दी जमवू शकत नाही. 

व्हॉईस रेकॉर्डिंगसाठी आम्ही लेपल माइकऐवजी बूम माइक वापरला. तो कॅमेरा फ्रेममध्ये बसत नाही. आत्ता संपूर्ण फुटेज एडिट केले जात आहे. सरकार येत्या दोन-तीन दिवसांत फायनल प्रॉडक्ट रिलीज करु शकते. लॉकडाऊननंतर कामावर कसे जायचे, कोणती खबरदारी घ्यावी? त्याचा एक संदेश या शॉर्ट फिल्ममध्ये देण्यात आला आहे. हा व्हिडीओ एक मिनिट 90 सेकंदांचा असेल. कलाकाराला स्टुडिओमध्ये येऊन डब करावे लागेल, असे मला वाटत नाही. यात अक्षय कुमार व्यतिरिक्त अतुल श्रीवास्तव देखील आहेत.

बातम्या आणखी आहेत...