आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपकमिंग वेब शो:'बाहुबली' सीरिजचे चित्रीकरण नोव्हेंबरमध्ये सुरू होईल, निर्माते रिअल लोकेशन्सवर चित्रीत करतील ही वेब सीरिज

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नयनतारा करणार डिजिटल पदार्पण

'बाहुबली - बिफोर द बिगिनिंग' या वेब सीरिजचे शुटिंग नोव्हेंबरपासून दक्षिण भारतात सुरू होणार आहे. या सीरिजचे निर्माते सप्टेंबरच्या अखेरीस केरळ आणि कर्नाटकमध्ये लोकेशनच्या शोधासाठी जातील. सूत्रानुसार, "युनिट जंगलांचा शोध घेत आहे, कारण निर्माते ही सीरिज रिअल लोकेशनवर शूट करण्याची योजना आखत आहेत. केरळ आणि कर्नाटकात गेल्या काही महिन्यांपासून लॉकडाऊनमध्ये होते, म्हणून आता ही टीम या राज्यांचा प्रवास करेल आणि अंतिम निर्णय घेईल.'

नयनतारा करणार डिजिटल पदार्पण
अभिनेत्री वामिका गब्बीला या सीरिजमध्ये शिवगामीच्या भूमिकेसाठी साईन करण्यात आले आहे आणि साऊथची सुपरस्टार नयनताराही या शोमधून तिचे डिजिटल पदार्पण करणार आहे. शाहरुख खानसोबतच्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर नयनतारा या शोच्या युनिटमध्ये सामील होईल. सिद्धार्थ तिवारीचे स्वस्तिक प्रॉडक्शन्स या वेब शोचे शो रनर असतील आणि याचे दिग्दर्शन रिभु दासगुप्ता आणि कुणाल देशमुख करणार आहेत.

जुन्या टीमचे सदस्य या सीरिजचा भाग राहणार नाहीत
रिभु दासगुप्ता आणि कुणाल देशमुख या मेगा सीरिजचे दिग्दर्शक म्हणून बोर्डवर येण्यापुर्वी, 'केसरी'चे दिग्दर्शक अनुराग सिंह प्रॉडक्शन हाऊसशी चर्चा करत होते, पण ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत त्यांचा ताळमेळ जमून आला नाही. 'बाहुबली'च्या दोन्ही भागांसाठी हिंदी संवाद लिहिणारे लेखक-गीतकार मनोज मुंतशीर आता या नव्या टीमचा भाग नाहीत. 'बाहुबली'ची पूर्वकथा सांगणारे पुस्तक लिहिणारे आनंद निलकंठम म्हणाले, 'टीममध्ये काही बदल झाला आहे की नाही, हे खरंच मला माहित नाही. माझ्या पुस्तकाचे हक्क एका प्लॅटफॉर्मने खरेदी केले आहेत आणि त्यावर शो तयार केला जात
आहे."

बातम्या आणखी आहेत...