आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

शूटिंग सुरू करण्याची तयारी:ऑक्टोबरपासून सुरू होईल 'ब्रह्मास्त्र'ची शूटिंग; 26 दिवसांच्या शेड्यूलला दोन-दोन शिफ्टमध्ये पूर्ण करतील रणबीर-आलिया

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फँटेसी ड्रामा 'ब्रह्मास्त्र'ची शूटिंग ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. दिग्दर्शक अयान मुखर्जीने चित्रपटाच्या उर्वरित 26 दिवसांच्या शेड्यूलला दोन शिफ्टमध्ये शूट करण्याची तयारी केली आहे. यासाठी रणबीर कपूर आणि आलिया भट्‌टला दोन-दोन शिफ्टमध्ये काम करावे लागेल. ब्रह्मास्त्रची शूटिंग लॉकडाउनमुळे मार्चपासून थाबंली आहे.

डिसेंबरपर्यंत चित्रपट पूर्ण करायचा आहे

मिड-डेच्या वृत्तानुसार अयानने शूट शेड्यूल दोन भागात विभागला आहे. गोरेगाव फिल्म सिटीमध्ये चित्रपटांसाठी दोन सेट तयार केले जातील. यातील एक क्रोमा बेस्ड असेल. अयानने सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत एक आणि 4 पासून 9 पर्यंत, असे 5-5 तासांच्या शिफ्ट ठरवल्या आहेत. करन जौहरला चित्रपट जून 2021 पर्यंत रिलीज करायचा असल्यामुळे अयान डिसेंबरपर्यंत शूटिंग पूर्ण करणार आहे.

अमिताभ बच्च यांच्याबाबत संशय

महामारी आटोक्यात आल्यास ऑक्टोबरपासून शूटिंग पुन्हा सुरू होईल. अयानच्या दोन्ही सेटवर कमीत-कमी क्रु असेल आणि सरकारच्या गाइडलाइन्सनुसार काम होईल. सध्या 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कलाकारांना शूटिंग करण्यास परवानगी नसल्यामुळे अमिताभ बच्चन यांच्याबाब साशंकता आहे.