आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्कर इंटरव्ह्यू:'गंगूबाई काठियावाडी'चे चित्रीकरण कामाठीपुरात झाले नाही, फिल्म सिटीमध्ये 25 कोटी रुपये खर्चून बनवला हुबेहूब कामाठीपुरा, गंगूबाईंनी विकत घेतलेला कॅफेही उभारला

अमित कर्ण6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1945-1970 च्या दशकातील कथा, चिनी दंतचिकित्सक क्लिनिकही दाखवण्यात येईल

आलिया भट्टचा आज प्रदर्शित होणारा ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपट मुंबई येथील देशाच्या सर्वात मोठ्या रेड लाइट एरिया कामाठीपुरावर आधारित आहे. येथील जग लोकांना कळावे यासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी मुंबईच्या फिल्म सिटीमध्ये सुमारे 25 कोटी रुपये खर्चून कामाठीपुराचा सेट उभा केला होता. यात रहीमलालाची वस्तीदेखील बनवण्यात आली. हा पूर्ण सेट दिग्गज निर्माते डिझायनर जोडी अमित रे आणि सुब्रतो चक्रवर्ती यांनी तयार केला आहे. या दोघांनी संजय लीला भन्साळीच्या ‘पद्मावत’ चित्रपटावरदेखील काम केले होते.

सेट बनवण्यास लागले 45 ते 50 दिवस
‘दिव्य मराठी’शी झालेल्या खास बातचीतमध्ये अमितने सांगितले, भन्साळी यांनी आम्हा सर्वांना कामाठीपुऱ्याच्या गल्लीत फिरवले. आमच्यासोबत चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर सुदीप चॅटर्जीदेखील होते. त्या काळातील काही ब्लॅक अँड व्हाइट फोटोदेखील त्यांनी आम्हाला दाखवले. सेटवरच सर्व काही आधारित आहे. पूर्ण कमाठीपुरा 500 ते 600 फुटांच्या भागात उभारला आहे. त्यातच रहीमलालाच्या गल्लीचा सेटही उभारण्यात आला आहे. पूर्ण सेट बनवण्यात 45 ते 50 दिवसांचा वेळ लागला. यात 500 ते 600 कारागिरांनी काम केले.

रहीमलालाचा मोहल्ला, गल्ली आणि ऑफिसही बनवले
अमित यांनी चित्रपटाविषयी सांगितले, यात 1945 पासून ते 1970 पर्यंतचा पूर्ण काठियावाडीचा सेट उभारण्यात आला. आम्ही शूटिंगसाठी मूळ कामाठीपुऱ्यात कधीच गेलो नाही आम्ही फिल्म सिटीमध्ये बनलेल्या सेटवरच पूर्ण शूटिंग केले. हा पूर्ण सेट उभारण्यात 20 ते 25 कोटी रुपये खर्च झाले. त्यात कामाठीपुऱ्याचे बरेच भाग आहेत. यात एक चीनी दंतचिकित्सक क्लिनिकही दाखवण्यात येईल. ते सोन्याचे दात बनवून देत असत. त्या काळात भारतीय डॉक्टरांची संख्या कमी होती. त्यावेळेचे चीनी दंतचिकित्सक प्रसिद्ध होते. त्यांचा मजेदार प्लाटदेखील तयार करण्यात आला.

रहीम लालाची भूमिका अजय देवगण करत आहेत. त्यांचे घर आणि मोहल्ला उभारण्यात आला. एकट्या रहीम लालाची गल्ली, ऑफिस आणि मस्जिद उभारण्यातच तीन कोटी रुपये खर्च झाले. गंगूबाईने जो कॅफे विकत घेतला होता, तो उभारण्यात आला.

रात्री केले दिवसाचे शूटिंग
सिनेमॅटोग्राफर सुदीप चॅटर्जीने चित्रपटाचे शूटिंग रात्रीच्या वेळी केले. त्यात बरेच दृश्य दिवसाचेही होते. पूर्ण कामाठीपुऱ्याच्या सेटमध्ये गंगूबाईचा कोठा सर्वात मोठा होता. तो बनवण्यासाठी कोलकात्याच्या सोनागाछी येथील रेड लाइट एरियाचीही आयडिया घेण्यात आली. सोनागाछी कामाठीपुऱ्यापेक्षा थोडे मोठे आहे. कामाठीपुऱ्याच्या सेटमध्ये गंगूबाईचा कोठा, त्यात अंगणाचाही समावेश होता. शिवाय संजय लीला भन्साळीने आलिया भट्टला मूळ कामाठीपुरा फिरवून आणले होते. आलियाला बुरखा घालून गाडीत बसवून पूर्ण कामाठीपुऱ्याचे चक्कर लावले होते. खरं तर संजय लीला भन्साळीच्या आईवडिलांचे घर कामाठीपुऱ्यापासून थोडे दूर ताडदेवमध्ये होते.

बातम्या आणखी आहेत...