आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांनी मंगळवारी उत्तराखंडच्या डेहराडूनमध्ये ‘बधाई दो’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. हर्षवर्धन कुलकर्णी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. त्यांनी सांगितले, मुुंबईवरून 150 लोकांची टीम शूटिंगसाठी डेहराडूनला रवाना झाली आहे.
डेहराडूनसह उत्तराखंडच्या काही शहरातदेखील 25 फेब्रुवारीपर्यंत या चित्रपटाचे शूटिंग चालणार आहे. या चित्रपटात राजकुमार राव एका पोलिस ठाण्यात एचएचओच्या भूमिकेत आहे. त्या ठाण्यात सर्व पुरुष कर्मचारी असतात. त्यानंतर त्या ठाण्यात भूमी पेडणेकरच्या पात्राची पोस्टिंग होते. चित्रपटातील महत्त्वाचे दृश्य डेहराडूनमध्ये चित्रित करण्यात आले. फेब्रुवारीमध्ये हरिद्वार आणि ऋषिकेशमध्येदेखील शूटिंग होणार आहे. तेथे पाेलिस स्टेशनमधील काही शाॅट्स आणि लोकल लग्नाचे काही दृश्य चित्रित केले जातील. गंगोत्रीमध्येही शूट करण्याचा विचार होता मात्र तो रद्द करण्यात आला.
चित्रपटात नसतील डोेंगरी संवाद
चित्रपटाचा सेट डोंगराळ भागात असला तरी चित्रपटाची भाषा डोंगरी असणार नाही. शूटिंगसाठी उत्तराखंडच्या थिएटर्समधून 15 ते 20 लोक कलाकरांनादेखील घेण्यात आले आहे. यापैकी काही राजकुमारसेाबत उत्तराखंड पोलिसांच्या भूमिकेत आहेत.
सीमा पाहवादेखील महत्त्वाच्या भूमिकेत
या सिनेमात सीमा पहावाचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ती चौथ्यांदा भूमीबरोबर काम करत आहे. यापूर्वी दोघीही ‘दम लगाके हैशा’, ‘शुभ मंगल सावधान’ आणि ‘बाला’ मध्ये एकत्र दिसल्या. तथापि, या चित्रपटात त्या भूमीच्या पात्रासोबत नव्हे तर राजकुमारच्या व्यक्तिरेखेसोबत दिसणार आहेत. या चित्रपटात त्या राजकुमारच्या ताईच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातील त्यांच्या भागाचे शूटिंग अद्याप झाले नसल्याचे सीमा सांगते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.