आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फायनली रॅपअप:साजिद नाडियाडवालांच्या 'बवाल' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण; वरुण धवनने शेअर केला व्हिडिओ, 'या' दिवशी प्रदर्शित होईल फिल्म

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 7 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे 'बवाल'

वरुण धवन आणि जान्हवी कपूर स्टारर 'बवाल' या चित्रपटाच्या अंतिम शेड्युलचे शूटिंग पूर्ण झाले आहे. वरुणने त्याच्या इंस्टाग्रामवर शेवटच्या शेड्यूलचा रॅप अप व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये वरुणने लिहिले की, "हमने मचा दिया है हर जगह बवाल!.... अज्जू भैय्याच्या स्टाईलमध्ये झाले रॅपअप... चित्रपट येतोय 7 एप्रिलला थिएटरमध्ये." असे वरुण म्हणाला आहे. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला यांनी केली असून चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा नितेश तिवारी यांनी सांभाळली आहे.

चित्रपटाचे शेवटचे शेड्यूल पोलंडमधील वॉर्सा येथे पूर्ण झाले आहे. रिपोर्ट्सनुसार, 'बवाल' हा वरुणचा आतापर्यंतचा सर्वात जास्त बजेट असलेला चित्रपट आहे.

'बवाल'चा रोजचा खर्च अडीच कोटी रुपये

चित्रपटाच्या जवळच्या एका सूत्राने सांगितल्यानुसार, "प्लॅनिंगनुसार, अ‍ॅक्शन सीनसाठी अनेक गोष्टींची आवश्यकता असते. बवालसाठी एका दिवसाच्या शूटिंगसाठी सुमारे 2.5 कोटी खर्च आला आणि चित्रपटाचे 10 दिवसांचे शेड्यूल होते. वरुणचा हा आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट आहे."

चित्रपटाचे अ‍ॅक्शन डायरेक्टर होते जर्मनीचे
सुत्रांनी पुढे सांगितल्यानुसार, “चित्रपट पॅरिस, बर्लिन, पोलंड, अॅमस्टरडॅम, क्राको, वॉर्सा यासारख्या महागड्या आणि मनोरंजक ठिकाणी तसेच भारतात चित्रपटाचा काही भाग शूट केला गेला. ही एक अतिशय अनोखी प्रेमकथा आहे आणि वॉर्सामध्ये एक मोठा अ‍ॅक्शन सीन शूट केला गेला. चित्रपटाचे अ‍ॅक्शन डायरेक्टर आणि स्टंटमॅन हे जर्मनीतील आहेत. चित्रपटाच्या क्रूमध्ये सुमारे 700 लोक होते."

7 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे 'बवाल'
नितेश तिवारी 'बवाल' चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर साजिद नाडियादवाला त्याची निर्मिती करत आहेत. या चित्रपटात वरुणसोबत जान्हवी कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. पुढील वर्षी 7 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...