आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुरचा प्रकल्प:तमन्ना स्टारर ‘बबली बाउन्सर’चे चित्रीकरण पूर्ण, टीमचा आनंदोत्सव

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तमन्ना भाटियाचा आगामी चित्रपट ‘बबली बाउन्सर’चे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. याबाबतची माहिती मधुर भांडारकर यांनी सोशल मीडिया अकाउंटवर काही छायाचित्रे आणि व्हिडिओ शेअर करून दिली आहे. शेअर केलेल्या व्हिडिओत मधुर आणि त्यांची टीम फिल्म रॅप उत्सव साजरा करताना दिसत आहे.

सोबत एकाच छायाचित्रात तमन्ना आणि मधुर चित्रपटाचा क्लॅपबोर्ड हातात पकडताना दिसत आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले...‘चित्रपट ‘बबली बाउन्सर’ रॅप-अप, 3 महीने 42 दिवसांच्या मस्त आठवणी, प्रेमळ मैत्री, छान टीमवर्क, खूप मस्ती. माझे सर्व कलाकार, तंत्रज्ञ आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत योगदान देणाऱ्या सर्व लोकांचे खूप खूप धन्यवाद!’ या चित्रपटाची निर्मिती फॉक्स स्टार स्टुडिओ आणि जंगली पिक्चर्सने केली आहे.

बातम्या आणखी आहेत...