आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरच्या आगामी 'जर्सी' चित्रपटाच्या चंदीगडच्या शेड्युलमध्ये निर्मात्यांना रोड ब्लॉकचा सामना करावा लागत आहे. कसौली आणि देहरादूनपूर्वी जर्सीच्या टीमला चंदीगडमध्ये या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटातील काही मुख्य भागांचे चित्रीकरण पूर्ण करायचे होते.
वृत्तानुसार, चित्रपटाचे चंदीगडमध्ये काही दिवसांचे शूट बाकी आहे. मात्र शेतकरी आंदोलनामुळे सध्या येथे उर्वरित चित्रीकरण करणे शक्य खूप कठीण जाईल असे निर्मात्यांना वाटले. या कारणास्तव, चित्रपटाच्या टीमने आपली योजना बदलली आणि गेल्याच आठवड्यात चित्रीकरणासाठी देहरादून गाठले.
आता चित्रपटाचे चित्रीकरण देहरादून येथे होणार
वृत्तानुसार, शाहिद, मृणाल ठाकूर आणि चित्रपटातील इतर कलाकार येत्या काही दिवसांत उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये चित्रपटाच्या काही भागांचे चित्रीकरण करणार आहे. त्यानंतर वेळापत्रकच्या शेवटच्या टप्प्यात ते चंदीगडला परत येतील. चंदीगडमध्ये तीन दिवसांचे चित्रीकरण बाकी आहे.
चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही
'जर्सी' हा चित्रपट याच नावाच्या तेलगू चित्रपटाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात शाहिद कपूर निवृत्त क्रिकेटपटूच्या भूमिकेत दिसणार आहे. जो आपल्या कमबॅकसाठीप्रयत्न करतो. या चित्रपटात शाहिद व्यतिरिक्त मृणाल ठाकूर आणि ज्येष्ठ अभिनेते पंकज कपूर मुख्य भूमिका साकारणार आहेत. अमन गिल, दिल राजू आणि अल्लू अरविंद यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.