आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • Shooting Of Varun Dhawan's 'Bhediya' Completed In The Forest Of Arunachal Pradesh, The First Schedule Was Completed By A Team Of 100 People In The Second Wave Of Corona

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शूटिंग अपडेट:अरुणाचल प्रदेशातील जंगलात पूर्ण झाले वरुण-कृतीच्या 'भेडिया’ चित्रपटाचे शूटिंग, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 100 लोकांच्या टीमने पूर्ण केले पहिले शेड्युल

अमित कर्ण13 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • जाणून घ्या कमी कालावधीत कसे पूर्ण झाले चित्रीकरण

काेराेना काळात सुरक्षित शूटिंग करणे खूपच अाव्हानात्मक आहे. सुरक्षित शूटिंग करणे अनेक प्रॉडक्शन हाऊसना सध्या जड जात आहे. त्यामुळे अनेक कोटींचे प्रोजेक्ट अडकले आहेत. यातच वरुण धवन यांच्या आगामी ‘भेडिया’ चित्रपटाच्या पहिल्या वेळापत्रकाचे शूटिंग टीमने पूर्ण केले आहे. पूर्ण सावधगिरी बाळगत टीमने शूटिंग पूर्ण केले. वरुण, कृती सेनन, अभिषेक बॅनर्जी आणि दिग्दर्शक अमर कौशिकसह 100 लोकांच्या या टीमने दोन महिन्यांपर्यंत अरुणाचल प्रदेशातील जंगलात शूटिंग केली आणि वेळेआधीच शूटिंगचे पहिले वेळापत्रक पूर्ण केले. जाणून घ्या त्यांनी काय केले...

जंगलात बऱ्याच अडचणी आल्या
अरुणाचल प्रदेशात शूटिंग करणे सोपे काम नव्हते. या काळात निसर्ग आणि हवामानाने अनेकदा टीमची परीक्षा घेतली. कधी पाऊस पडायचा तर कधी धुके पडायचे. त्यामुळे सिनेमॅटोग्राफरला बऱ्याच अडचणी आल्या. उन्हात घेणाऱ्या शॉटसाठी ऊन पडण्याची बराच वेळ वाट पाहावी लागत होती. हवामानाने त्रास दिलाच, पण जंगलातील किडे, जीवजंतूही त्रास देत होते. जंगलात अनेकदा शूटिंगदरम्यान टीमला बारीक किड्यांचा त्रास झाला. कधी झाडावरून ते कधी पानावरून ते अंगावर पडत हाेते. इतक्या अडचणीत निर्मात्यांनी शूटिंग पूर्ण केले.

तीन दिवसांपूर्वी पूर्ण झाले शूटिंग
चित्रपटाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या वेळापत्रकाचे शूटिंग 3 मार्चपासून सुरू झाले आणि 21 एप्रिलपर्यंत चालले. शूटिंगदरम्यान कोविडचे एकही प्रकरण सेटवर समोर आले नाही. विशेष म्हणजे, शूटिंगचे वेळापत्रक 26 एप्रिलपर्यंत होते. परंतु निर्मात्यांनी ते 3 दिवस आधीच पूर्ण केले. त्यानंतर 22 एप्रिल रोजी संपूर्ण टीम मुंबईला परतली होती.

या नियमांचे पालन करून टीमने पूर्ण केले शूटिंग

 • निर्मात्यांनी शूटिंगसाठी अरुणाचल प्रदेशातील कोरोनाचे कमी रुग्ण असलेल्या शहरात शूटिंग केले.
 • शूटिंग स्थळावर पोहोचल्यानंतर सर्वच क्वाॅरंटाइन झालो. त्यानंतर शूटिंग सुरू केले.
 • मुख्य अभिनेत्यासह पूर्ण टीमने शूटिंगदरम्यान बायोबबल रूल फॉलो केले.
 • सेटवर जाण्याआधी प्रत्येक सदस्याची दोनदा कोरोना चाचणी करण्यात आली.
 • सेटवर पोहोचल्यानंतर निर्मात्यांनी मुंबईवरून कोणालाही न बोलावण्याचा निर्णय घेतला.

आम्ही मास्क काढला तर आम्हाला निर्माते ओरडायचे
‘स्त्री’, ‘पाताललोक’ आणि ‘मिर्झापूर’ सारख्या प्रोजेक्ट्समध्ये दिसलेले अभिनेते अभिषेक बॅनर्जी ‘भेड़िया’ मध्ये मुख्य भूमिकेत आहेत. त्यांनी सांगितले, आम्ही शूटिंगमध्ये खूप काळजी घेतली. सेटवर कोणी एकमेकांशी हस्तांदोलन करत नव्हते. आम्ही सर्वच मास्क लावून ठेवत होतो. कुणाचाही मास्क नाकाच्या खाली आला तर निर्माती पूजा व्हिजन त्यांना ओरडायची. तिने सर्वांना मास्क घालण्याची विनंती केली होती.

बातम्या आणखी आहेत...