आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सस्पेन्स थ्रिलर:लंडनमध्ये सुरू झाले विद्या बालनच्या ‘नीयत’चे शूटिंग; सोशल मीडियावर पोस्ट केली शेअर

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्या बालनने आपल्या आगामी ‘नीयत’ चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. चित्रपटाची पूर्ण यूनिट लंडनला पोहोचली आहे. या चित्रपटात विद्यासोबत शहाणा गोस्वामी, शशांक अरोरा सारखे कलाकार दिसणार आहेत. विद्याने आपल्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. त्यात तिच्या हातात क्लॅपबोर्ड दिसत आहे. फोटोमध्ये तिच्यासोबत दिग्दर्शक अनू मेनन देखील आहेत. तिने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले...,‘माझ्या काही आवडत्या लोकांसोबत मी अलीकडच्या काळात वाचलेल्या सर्वात आकर्षक स्क्रिप्ट्सपैकी एकाचे शूटिंग सुरू करण्यास उत्सुक आहे.’

‘नीयत’ हा एक सस्पेन्स आणि थ्रिलर चित्रपट असेल, ज्याचे शूटिंग लंडनमध्ये सुरू झाले आहे. विद्या बालनने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने हातात क्लब बोर्ड धरलेला दिसतो आहे. या फोटोमध्ये विद्या बालनसोबत दिग्दर्शक अनु मेननही दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना विद्या बालनने लिहिले की, “माझ्या काही आवडत्या लोकांसोबत मी अलीकडच्या काळात वाचलेल्या सर्वात आकर्षक स्क्रिप्टपैकी एकाचे शूटिंग सुरू करण्यास उत्सुक आहे.” मंगळवार, 10 मे रोजी विद्याने नीयतच्या सेटवरील अनु मेनन आणि विक्रम मल्होत्रा यांच्यासोबतचा हा फोटो शेअर केला.

विद्या बालनचे चित्रपट बर्‍याच दिवसांपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत आणि आता ''नीयत'' हा चित्रपट देखील ओटीटी प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओ वर प्रदर्शित होणार आहे. याची घोषणा खुद्द अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओने केली आहे. या चित्रपटाची निर्मिती अबंडेशिया ही कंपनी करते आहे. ही कंपनी प्रसिद्ध निर्माते विक्रम मल्होत्राची यांची आहे. या चित्रपटात विद्या बालन बरोबरच शहाना गोस्वामी, शशांक अरोरा, नीरज काबी, राम कपूर, मीता वशिष्ठ, अमृता पुरी आणि प्राजक्ता कोळी हे कलाकार दिसणार आहेत. ‘नीयत’हा विद्या बालनचा दुसरा चित्रपट आहे, जो अ‍ॅमेझॉन प्राईम वर स्ट्रीम होईल. यापूर्वी या प्लॅटफॉर्मवर विद्याचा ‘जलसा’ चित्रपट प्रदर्शित झाला होता

बातम्या आणखी आहेत...