आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Shows Of Avatar 2 Will Run For 24 Hours In Selected Cities Of The Country, Advance Booking Of The Film Started, The Final Trailer Of The Film Was Also Released

'अवतार-2'ची अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू:देशातील निवडक शहरांमध्ये 24 तास चालतील चित्रपटाचे शो, चित्रपटाचा शेवटचा ट्रेलरही प्रदर्शित

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेम्स कॅमेरॉनच्या 'अवतार: द वे ऑफ वॉटर' या चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाचे शो देशातील निवडक शहरांमध्ये 24 तास चालतील. पहिला शो 16 डिसेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजता होणार आहे. या चित्रपटाची एवढी जोरदार चर्चा आहे की, रिलीज होण्याच्या 25 दिवस आधीच त्याची अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून यावेळी प्रेक्षकांना काहीतरी नवीन अनुभवायला मिळेल, असा विश्वास निर्मात्यांना आहे.

सुमारे दोन हजार कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाचे स्पेशल इफेक्ट्स, व्हीएफएक्स आणि बॅकग्राउंड स्कोअर खूपच प्रभावी दिसत आहेत. प्रेक्षकांसाठी हा पूर्णपणे नवीन अनुभव असेल. या चित्रपटाचा नवा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच तो सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला. ट्रेलर आणि पोस्टर शेअर करून सोशल मीडिया यूजर्स चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.

'अवतार'च्या पहिल्या भागाने जगभरात केले होते 19 कोटींचे कलेक्शन
अवतार फ्रेंचायझीचा पहिला चित्रपट 2009 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड्स मोडित काढले होते. सिनेमॅटिक इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. या चित्रपटाने जगभरात एकूण 19 हजार कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले होते. चित्रपट प्रदर्शित होऊन 14 वर्षांचा काळ उलटला असला तरी कमाईच्या बाबतीत चित्रपट आजही अव्वल आहे.

'अवतार'चा सिक्वेलमध्ये सॅम वॉशिंग्टन, जोई सल्डाना, स्टीफन लँग या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट इंग्रजीशिवाय हिंदी, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. इतकेच नाही तर ‘अवतार’चे आणखीन तीन भाग येणार असल्याची चर्चा आहे. तिसरा भाग ‘अवतार : द सिड बेअरेर’ हा 2024 मध्ये प्रदर्शित होणार अशी चर्चा आहे तर पुढचे 2 भाग 2026 आणि 2028 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा-

बातम्या आणखी आहेत...