आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रद्धा कपूरचा भाऊ आणि अभिनेता सिद्धांत कपूर याला ड्रग्ज प्रकरणात पॉझिटिव्ह आढळल्याने बंगळुरू पोलिसांनी रेव्ह पार्टीतून ताब्यात घेतले होते. या पार्टीत तो डीजे म्हणून सामील झाला होता. मात्र, या प्रकरणात त्याला 24 तासांत जामीन मिळाला आहे. पण पोलिसांच्या चौकशीत त्याने पार्टीतील लोकांकडे ड्रग्ज असल्याची माहिती त्याला नसल्याचे सांगितले आहे.
मी डीजे वाजवायला येतो
रेव्ह पार्टीमध्ये ड्रग्जबाबत सिद्धांत कपूरची पोलिसांनी चौकशी केली होती. यामध्ये त्याने मला कोणीतरी ड्रिंक्स आणि सिगारेट दिल्याचे सांगितले. ड्रिंक्समध्ये ड्रग्ज आधीच होते हे मला माहीत नव्हते. मला नेहमी पार्ट्यांमध्ये डीजे वाजवण्यासाठी आमंत्रित केले जाते, असे सिद्धांतने आपल्या जबाबात सांगितले आहे.
सिद्धांत अनेकदा बंगळुरूला जातो
पूर्व विभाग बंगलोर शहराचे डीसीपी भीमाशंकर म्हणाले, “सिद्धांतने त्याच्या वक्तव्यात दावा केला आहे की त्याच्या पेयांमध्ये ड्रग्ज मिसळले होते. याची कल्पना त्याला नव्हती." डीसीपींनी सांगितल्यानुसार, सिद्धांत अनेकदा बंगळुरुमध्ये पार्ट्यांमध्ये डीजे म्हणून होण्यासाठी येतो. जेथून त्याला अटक झाली तेथे तो चौथ्यांदा गेला होता. सध्या आमच्याकडे पाहुण्यांची यादी आणि संशयितांची नावे आहेत ज्यांची अजून चौकशी व्हायची आहे.
अमली पदार्थांच्या तस्करीच्या अँगलचीही चौकशी केली जाईल
डीसीपी पुढे म्हणाले की, बंगळुरूमध्ये सिद्धांतचे अनेक मित्र आहेत. या प्रकरणात सिद्धांत व्यतिरिक्त, आम्ही माइंड फायर बिझनेस मॅनेजर अखिल सोनी, उद्योगपती हरजोत सिंग यांच्यासह इतर दोन आरोपींचे मोबाईल देखील जप्त केले आहेत आणि डेटा रिकव्हरीसाठी पाठवले आहेत. आम्ही या प्रकरणाचा अमली पदार्थांच्या तस्करीच्या दृष्टिकोनातूनही तपास करत आहोत. हॉटेल मालक आणि रेव्ह पार्टीच्या आयोजकांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे. इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या प्रतिनिधीलाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.