आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इमोशनल:श्रद्धा कपूरने व्यक्त केलं प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांचे दु:ख, वाघिणीचा आवाज होऊन म्हणाली- स्वातंत्र्याच्या विचारात मी इथंच मरणार का?

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्राण्यांच्या हक्कासाठी काम करणारी संस्था पेटाने हा व्हिडीओ तयार केला आहे.

सध्या लाकडाऊनमध्ये लोक घरात अडकले आहेत, घरात बंद असतानाच्या भावना ते व्यक्त करीत आहेत आणि त्यातूनच पिंज-यात वर्षानूवर्षे कैद असलेल्या प्राण्यांबाबतही आता लोक व्यक्त होऊ लागले आहेत. अभिनेत्री श्रद्धा कपूरने सोशल मिडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, त्यात पिंज-यात कैद असलेल्या प्राण्याचं दुख तिनं व्यक्त केलं आहे. कॅप्शनमध्ये प्राणीसंग्रहालय बंद करण्याची विनंती करताना ती म्हणतेय, 'या लॉकडाऊनमध्ये लोक चिंतित आहे, एकटेपणा त्यांना जाणवू लागला आहे, विचार करा तुम्हाला तुमच्या कूटूंबापासून दूर केले किंवा पुर्ण आयुष्यसाठी तुरुंगात डांबले तर तुम्हाला कसं वाटेल?'

व्हिडीओत प्राण्यांची इमोशनल कहाणी

प्राण्यांच्या हक्कासाठी काम करणारी संस्था पेटाने हा व्हिडीओ तयार केला आहे. यात श्रद्धा कपूरने एका वाघिणीच्या बछड्याला स्वतःचा आवाज दिला आहे. या वाघिणीच्या बछड्याच्या माध्यामातून श्रद्धाने प्राण्यांची इमोशनल कहानी लोकांना ऐकवली आहे. 

पिंज-यात बंद असलेली बेबी टाइग्रेस सांगतेय, 'माझी आई सांगत होती कुठं तरी दूर एक जादूची नगरी आहे, जिचं नाव स्वातंत्र्य आहे, तिथं ना बेड्या आहेत, ना कुठली रोकटोक.सगळे एक सारखे आहे. जिथं माझ्यासारखे लहानगे खुल्या मैदानात बागडतात, जिथं वा-यापेक्षासुद्धा जास्त जोरात आम्ही धावतो. सगळ्यांचे अनेक प्रकारचे मित्र आहेत आणि सगळे सोबत खेळतात, आनंदान आत्मविश्वासानं उडी मारतात आणि संध्याकाळ झाली की सगळे घरी आपल्या कुटूंबाजवळ परततात, मस्त आहे ना ही कहाणी.'

यानंतर ती बेबी टाइग्रेस भावुक होते आणि सत्य सांगायला लागते. ती म्हणते, 'माझ जीवन मात्र या गोष्टीपेक्षा एकदम वेगळं आहे,  माझा तर जन्मच या पिंज-यात झाला, दोन वर्षांपासून हेच माझं घर आहे,  माझी आई 8 वर्षांपासून  या कैदैत आहे, 8 वर्षांत किती दिवस असतात आणि किती तास?'

आणि शेवटी ही बेबी टाइग्रेस लॉकडाऊन मध्ये राहणा-या लोकांना एक सवाल करते,  'तुम्हाला किती दिवस झाले? माहिती आहे त्रास तर तुम्हाला खूप होत असेल, मी माझ्या आईला सांगेल की तुम्हाला सुद्धा त्या जादूच्या नगरीची गोष्ट सांगा. स्वातंत्र्याबाबत बोलल्यावर कदाचित स्वातंत्र्य जाणवायला लागेल,  काय हे शक्य नाही का की जादूच्या नगरीतील खरेपणा कुठं असेल?  काय खरंच माझी आई कधी स्वतंत्र विहार करीत होती,  काय हे शक्य नाही की मलाही तुम्ही असा स्वतंत्र विहार करू देणार.  स्वातंत्र्य असलेल्या विश्वात मला कुणी घेवून जाईलकी, मी याच पिंज-यात दिवस मोजत राहणार आणि दिवस मोजता मोजता एक दिवस इथंच जीव सोडणार.'

बातम्या आणखी आहेत...