आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आणि अभिनेता सिद्धांत कपूरची ड्रग्ज प्रकरणात जामिनावर सुटका करण्यात आली आहे. बंगळुरू पोलिसांनी 12 जूनच्या रात्री पबमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीतून सिद्धांतला अटक केली होती. या पार्टीत तो डीजे म्हणून सहभागी झाला होता. पार्टीमध्ये सिद्धांतसह सहा जण ड्रग्ज टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळले.
जामिनावर झाली सुटका
बंगळुरू शहर पूर्व विभागाचे डीसीपी डॉ. भीमाशंकर यांनी सांगितल्यानुसार, श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर आणि पार्टीतून अटक करण्यात आलेल्या इतर चार जणांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. जेव्हा जेव्हा या प्रकरणाशी संबंधित चौकशीसाठी बोलावले जाईल तेव्हा सिद्धांतला पोलिसांसमोर हजर राहावे लागणार आहे.
सिद्धांतला ताब्यात घेतल्यानंतर काय म्हणाले होते पोलीस?
बंगळुरूमध्ये छापा टाकून बंगळुरू पोलिसांनी सिद्धांतला ताब्यात घेतले होते. त्याच्यावर ड्रग्ज घेतल्याचा आरोप आहे. “ड्रग्स सेवनात दोषी ठरलेल्या सहा लोकांमध्ये सिद्धांत एक आहे. हे सर्व लोक बंगळुरूमधील एमजी रोडवरील एका हॉटेलमध्ये होते, जिथे ही पार्टी सुरु होती. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तेथे पोहोचून छापा टाकला”, अशी माहिती बंगळुरू पोलिसांनी दिली होती.
सुशांत प्रकरणात NCBने केली होती श्रद्धाची चौकशी
सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या चौकशी यादीत श्रद्धा कपूरचाही समावेश होता. मात्र, तिच्याविरुद्ध ठोस पुरावे सिद्ध होऊ शकले नाहीत. श्रध्दा कपूर, सारा अली खान आणि दीपिका पदुकोण यांची नावे सप्टेंबर 2020 मध्ये व्हॉट्सअॅप चॅटमध्ये दिसल्यावर त्यांची चौकशी करण्यात आली होती.
सिद्धांत कपूरची कारकीर्द
सिद्धांत कपूर हा बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांचा मुलगा आहे. 1997 मध्ये आलेल्या 'जुडवा' या चित्रपटातून त्याने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. सिद्धांतने अग्ली, जज्बा, हसीना पारकर, पलटन, हॅलो चार्ली आणि चेहरे यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'भौकाल' या मालिकेतही सिद्धांत दिसला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.