आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रद्धा कपूरचा भाऊ ड्रग्ज केसमध्ये ताब्यात:सिद्धांतचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह, न्यायालयीन कोठडीची मागणी करणार आहेत पोलीस

बंगळुरू18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अंमली पदार्थांचे सेवन कुठे होते माहीत नाही : डीसीपी

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आणि अभिनेता सिद्धांत कपूरला बंगळुरू पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिद्धांतवर पार्टीमध्ये ड्रग्ज घेतल्याचा आरोप आहे. बंगळुरूमधील एमजी रोडस्थित हॉटेल पार्कच्या पबमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता. या पार्टीत सिद्धांतला डीजे म्हणून बोलावण्यात आले होते. पार्टीमध्ये सिद्धांतसह सहाजण ड्रग्ज टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळले आहेत. दरम्यान याप्रकरणी सिद्धांतच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 'मी फक्त एक गोष्ट सांगू शकतो की ते शक्य नाही,' असे शक्ती कपूर म्हणाले आहेत.

न्यायालयीन कोठडीची मागणी करणार : डीसीपी
बंगळुरू शहर पूर्व विभागाचे डीसीपी डॉ. भीमाशंकर यांनी सांगितल्यानुसार, या प्रकरणी हे सर्वजण ड्रग्ज घेऊन पार्टीला आले होते की हॉटेलमध्ये ड्रग्ज आधीच नेण्यात आले होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सर्व आरोपींना उलसूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. सिद्धांत कपूरच्या वैद्यकीय अहवालात त्याने अमली पदार्थांचे सेवन केल्याचे सिद्ध झाले आहे. आम्ही त्यांना अटक केली असून पुढील प्रक्रिया पूर्ण करत आहोत. सिद्धांतला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याची मागणी करणार आहोत, असे पोलिसांनी सांगितले.

सुशांत प्रकरणात NCBने केली होती श्रद्धाची चौकशी
सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या चौकशी यादीत श्रद्धा कपूरचाही समावेश होता. मात्र, तिच्याविरुद्ध ठोस पुरावे सिद्ध होऊ शकले नाहीत. श्रध्दा कपूर, सारा अली खान आणि दीपिका पदुकोण यांची नावे सप्टेंबर 2020 मध्ये व्हॉट्सअॅप चॅटमध्ये दिसल्यावर त्यांची चौकशी करण्यात आली होती.

सिद्धांत कपूरची कारकीर्द
सिद्धांत कपूर हा बॉलिवूड अभिनेता शक्ती कपूरचा मुलगा आहे. 1997 मध्ये आलेल्या जुडवा या चित्रपटातून त्यांनी करिअरला सुरुवात केली. सिद्धांतने अग्ली, जज्बा, हसीना पारकर, पलटन, हॅलो चार्ली आणि चेहरे यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भाऊकाल या मालिकेतही सिद्धांत दिसला होता.

बातम्या आणखी आहेत...