आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्नाचा मुहूर्त ठरला:4 फेब्रुवारी रोजी लग्नाच्या गाठीत अडकणार आहे श्रद्धा कपूरचा भाऊ, निर्मात्याच्या मुलीसोबत करतोय लग्न

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेत्री श्रद्धा कपूरचा मावस भाऊ आहे प्रियांक

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा आणि 'सब कुशल मंगल है' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता प्रियांक शर्मा याचा लग्नाचा मुहूर्त निश्चित झाला आहे. येत्या 4 फेब्रुवारी रोजी निर्माते करीम मोरानी यांची मुलगी शजा मोरानी हिच्यासोबत प्रियांक नोंदणी पद्धतीने लग्न करतोय. लग्नानंतर कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांसाठी ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात येणार आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूरचा मावस भाऊ आहे प्रियांक
प्रियांक आणि शजा यांचा गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात साखरपुडा झाला होता. हे दोघेही 2018 पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. श्रद्धा कपूचा भाऊ सिद्धांतने सोशल मीडियावर साखरपुड्याचे काही फोटो पोस्ट केले होते. ‘तुम्हा दोघांसाठी मी खूप खुश आहे. माझ्या सर्वांत आवडत्या जोडीचं लवकरच लग्न होणार आहे’, असे कॅप्शन त्याने दिले होते. या साखरपुड्याला शक्ती कपूर, सिद्धांत आणि शिवांगी कोल्हापुरे यांनी हजेरी लावली होती. शक्ती कपूर यांची पत्नी शिवांगी कोल्हापुरे ही पद्मिनी कोल्हापुरेची बहीण आहे. तर प्रियांक हा अभिनेत्री श्रद्धा कपूरचा मावस भाऊ आहे.

रीवाबरोबर प्रियांकने डेब्यू केला होता
प्रियांकने चित्रपटात येण्यापूर्वी नादिरा बब्बर यांचा ग्रुप, नीरज काबी आणि सलीम आरिफ यांच्याबरोबर थिएटर केले आहे. त्याने रवि किशन यांची मुलगी रीवा सोबत 'सब कुशल मंगल है' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.

शजाने 'ऑलवेज कभी कभी' आणि 'हॅपी न्यू इयर' या चित्रपटांसाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे. मागील वर्षी शजा, तिची बहीण जोआ आणि वडील करीम मोरानी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे काही दिवस त्यांना रुग्णालयात राहावे लागले होते.

बातम्या आणखी आहेत...