आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाच्या विळख्यात संगीतकाराचे कुटुंब:श्रवण राठोड यांची पत्नी आणि मोठा मुलगा रुग्णालयात देत आहे कोरोनाशी लढा, घरी क्वारंटाइन असलेल्या धाकट्या मुलाने केले अंत्य संस्कार

राजेश गाबा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुरुवारी रात्री झाले श्रवण राठोड यांचे निधन

दिवंगत संगीतकार श्रवण कुमार राठोड यांचा मुलगा संजीव यांनी दहा लाख रुपयांचे बिल न भरल्यामुळे एस एल रहेजा हॉस्पिटलने वडिलांचे पार्थिव शरीर देण्यास नकार दिल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. संजीव आणि त्यांची आई यांनादेखील कोरोनाची लागण झाली असून दोघांवरही सध्या मुंबईतील 7 हिल्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. दुसरीकडे, संजीव यांचा छोटा भाऊ दर्शन (श्रवण यांचा धाकटा मुलगा) ला सोसायटीने 14 दिवस घरात क्वारंटाइन ठेवले होते.

कोरोना प्रोटोकॉल अंतर्गत झाले अंत्यसंस्कार केले

शिवाजी पार्क येथे कोरोना प्रोटोकॉलअंतर्गत दर्शन राठोड यांनी वडिलांचे अंत्यसंस्कार केले. रुग्णालयात दाखल असल्याने श्रवण यांच्या पत्नी आणि मोठा मुलगा संजीव त्यांना शेवटचा निरोप घेण्यासाठी येऊ शकले नाहीत. दर्शन यांनी एस एल रहेजा रुग्णालयातून वडिलांचे पार्थिव घेतले होते. तेथून बीएमसीच्या अ‍ॅम्ब्युलन्सने शिवाजी पार्क येथे श्रवण यांचे पार्थिव नेण्यात आले होते.

'वडिलांचा दहा लाख रुपयांचा विमा होता'

दिव्य मराठीसोबत फोनवर झालेल्या संभाषणात संजीव म्हणाले, "माझ्या वडिलांचा दहा लाख रुपयांचा विमा आहे. रुग्णालयाने इंश्युरन्सचे सर्व पेपर वर्क पूर्ण केले. सरकारी कायद्यानुसार ते प्रोटोकॉल सांभाळत आहेत. अडचण अशी आहे की मी आणि माझी आई सेव्हन हिल्समध्ये इस्पितळात दाखल आहोत. आम्ही दोघेही कोविडवर उपचार घेत आहेत. धाकटा भाऊ दर्शन घरी क्वांरटाइनमध्ये होता. आम्ही वडिलांकडे रुग्णालयात पोहोचू शकलो नाही. समन्वय साधणे कठीण होते. व्यवस्थापनाशी बोलू शकत नव्हतो. त्यामुळे हे मिस कम्युनिकेशन घडले."

'आम्ही तिथे असतो तर ही बातमी आली नसती'

संजीव म्हणाले, "आम्हाला रुग्णालयाकडून पैशांसाठी त्रास दिला जातोय, ही बातमी खोटी आहे. आम्ही तिथे असतो तर ही बातमी आली नसती. आपण दिव्य मराठीच्या माध्यमातून ही माहिती श्रवण यांच्या चाहत्यांपर्यंत पोहचवा. आम्हाला एसएल रहेजा मॅनेजमेंट कडून पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा मिळत आहे.'

'सोसायटी मधील लोकांची समजूत घालण्यासाठी अधिक वेळ लागला'

संजीव म्हणाले, "माझ्या वडिलांना कोरोना झाला होता. आई आणि मलादेखील संसर्ग झाला, धाकटा भाऊ दर्शनलाही सोसायटीने 14 दिवस क्वांरटाइन केले होते. सोसायटीमधील लोक त्याला घराबाहेर पडण्याची परवानगी देत नव्हते. त्यांची समजूत घालायला खूप वेळ लागला. देव आमच्या वडिलांच्या आत्म्याला शांती देवो. आम्ही दोन्ही भाऊ त्यांचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्याचा आणि त्यांचा संगीत वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करू."

गुरुवारी रात्री झाले श्रवण राठोड यांचे निधन

गुरुवारी रात्री रहेजा रुग्णालयातील डॉ. कीर्ती भूषण यांनी श्रवण राठोड यांच्या निधनाची पुष्टी केली. ते म्हणाले, "श्रवण यांचे रात्री 9:30 वाजता निधन झाले. आम्ही प्रयत्न केला परंतु ते आजारातून बाहेर येऊ शकले नाही. श्रवण यांना कोरोना संसर्ग झाला होता, आणि त्यांचे अवयव निकामी झाले होते."

नदीम-श्रवण 90 च्या दशकातील हिट जोडी होती

श्रवण हे बॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीतकार होते. नदीम सैफी यांच्यासमवेत त्यांनी अनेक चित्रपटांत उत्तम संगीत देऊन लोकप्रियता मिळविली होती. नदीम-श्रवण जोडी 90च्या दशकात सर्वाधिक चर्चेत आली. या जोडीने सर्वप्रथम 1977 मध्ये ‘दंगल’ या भोजपूरी चित्रपटाला संगीत दिले होते, या चित्रपटातील त्यांनी संगीतबद्ध केलेले 'काशी हिले पटना हिले' हे गाणे खूप गाजले होते. यानंतर दोघांनी 'जीना सिख लाया' या बॉलिवूड चित्रपटाला संगीत दिले. दोघांनाही 'आशिकी' या चित्रपटातील संगीतामुळे लोकप्रियता मिळाली, हा चित्रपट म्युझिकल हिट ठरला होता. त्यावेळी या चित्रपटाच्या अल्बमच्या सुमारे 20 कोटी कॉपी विकल्या गेल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...