आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुड न्यूज:लग्नाच्या 6 वर्षांनी आई होणार आहे श्रेया घोषाल, सोशल मीडियावर बेबी बंपसोबतचा फोटो शेअर करत बाळाचे नाव केले जाहीर

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 5 फेब्रुवारी 2015 रोजी केले होते गुपचुप लग्न

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल लग्नाच्या सहा वर्षांनी आई होणार आहे. सोशल मीजियावर बेबी बंपसोबतचा एक फोटो शेअर करत श्रेयाने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. विशेष म्हणजे तिने आपल्या होणा-या बाळाचे नावदेखील जाहीर केले आहे. 36 वर्षीय श्रेयाने पती शीलादित्य मुखोपाध्यायच्या नावावरुन बाळाचे नाव ठेवले आहे.

श्रेयाने सोशल मीडियावर लिहिले, ”बेबी श्रेयादित्य लवकरच येत आहे. शीलादित्या आणि मला ही बातमी तुमच्या सोबत शेअर करताना आनंद होतोय. आम्ही आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात करत आहोत. तुम्हा सर्वांचे आशिर्वाद आणि प्रेम याची आम्हाला गरज आहे,” असं कॅप्शन देते श्रेयाने तिचा बेबी बंपसोबतचा फोटो शेअर केला आहे. ही गोड बातमी समजल्यानंतर चाहते श्रेयावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

5 फेब्रुवारी 2015 रोजी केले होते गुपचुप लग्न
5 फेब्रुवारी 2015 रोजी श्रेयाने बॉयफ्रेंड शीलादित्य मुखोपाध्यायसोबत लग्न केले होते. विशेष म्हणजे हे त्यांचे सीक्रेट वेडिंग होते. लग्नाच्या दुस-या दिवशी 6 फेब्रुवारी रोजी श्रेयाने लग्नाचा फोटो शेअर करत लग्नाची बातमी दिली होती.

'देवदास'द्वारे झाली करिअरची सुरुवात
श्रेयाने आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात शाहरुख खान, माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय बच्चन स्टारर 'देवदास'द्वारे केली होती. सारेगमप या सांगितिक कार्यक्रमात दिग्दर्शक संजय लीला भन्साळी श्रेयाचे सादरीकरण पाहून इम्प्रेस झाले होते, त्यांनीच तिला पहिली पार्श्वगायनाची संधी दिली होती.

एका मुलाखतीत श्रेया म्हणाली होती, "संजय भन्साळी यांनी माझा शोध घेतला. त्यांचा पहिला फोन कॉल कायम लक्षात राहणारा आहे. 'हम दिल दे चुके सनम'चे दिग्दर्शक फोन लाइनवर आहेत आणि माझ्याशी बोलत आहेत, यावर माझा विश्वास बसला नव्हता.' श्रेयाने 'देवदास' या चित्रपटातील 'सिलसिला ये चाहत का..', 'बैरी पिया...' , 'छलक-छलक...', 'मोरे पिया...' आणि 'दिल डोला रे...' ही पाच गाणी स्वरबद्ध केली होती.

श्रेयाने 'जहर', 'परिणीता', 'रब ने बना दी जोडी', 'विवाह', 'द किलर', 'हॉलिडे', 'ओम शांति ओम', 'जब वी मेट', '3 इडियट्स', 'द डर्टी पिक्चर', 'बोल बच्चन', 'पीके', 'कलंक', 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' या चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे. आतापर्यंत 4 नॅशनल आणि 16 फिल्मफेअर (10 साऊथ फिल्मफेअरसह) अवॉर्ड आपल्या नावी केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...