आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनातील दुःख:'ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्या मित्रांनीच पाठित खंजीर खुपसला', श्रेयस तळपदेचा धक्कादायक खुलासा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्वतःचं मार्केटिंग करण्यात कमी पडलो

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेने हिंदी चित्रपटसृष्टीतही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. इकबाल या चित्रपटातून त्याने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. 'इकबाल'नंतर, 'अपना सपना मनी मनी', 'ओम शांती ओम', 'गोलमाल 3', 'हाऊसफुल 2' अशा अनेक चित्रपटांमध्ये श्रेयसने काम केले. मात्र गेल्या काही वर्षांत श्रेयस हिंदी चित्रपटसृष्टीपासून दुरावला असल्याचे दिसत आहे. एका मुलाखतीत श्रेयसने इंडस्ट्रीतल्या मित्रांनीच पाठीत खंजीर खुपसला, असे धक्कादायक वक्तव्य केले आहे.

स्वतःचं मार्केटिंग करण्यात कमी पडलो
इकबाल या चित्रपटात श्रेयस मुख्य भूमिकेत झळकला. मात्र त्यानंतर तो मल्टीस्टारर चित्रपटांचा एक भाग बनून राहिला. याबाबत टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत श्रेयस म्हणाला, 'मी स्वत:चे मार्केटिंग करण्यात मी कमी पडलो. मी अनेक सोलो चित्रपटांत काम केले. पण त्यापैकी बहुतेकांना यश मिळाले नाही. माझ्यात एकच कमतरता होती, ती म्हणजे मला स्वत:चं मार्केटिंग करणे जमले नाही. माझे काम पाहून मला इतर लोक काम देतील, याच भावनेने मी काम करत होतो. आज असे अनेक जण आहेत ज्यांना अभिनय येत नाही तरीही ते फक्त प्रसिद्धीच्या जोरावर मोठमोठ्या चित्रपटात काम करतायत आणि आमच्यासारखे ज्यांना खरंच अभिनय येतो ते कामाशिवाय घरी बसलेत,' असे तो म्हणाला.

ज्यांच्यावर विश्वास ठेवल्या त्या मित्रांनीच पाठीत खंजीर खुपसला
श्रेयस पुढे म्हणाला, 'बॉलिवूडमधील कित्येक अभिनेते माझ्यासोबत काम करायला तयार नाहीत आणि मला चित्रपटांमध्ये घेऊ इच्छित नाहीत. पण मी याच मित्रांच्या भल्याचा विचार करून काही चित्रपट केले आणि आज त्यांनीच माझ्या पाठीत खंजीर खुपसला. काही मित्र पुढे गेले, चित्रपट बनवू लागले. मलापण चांगल्या भूमिकांची गरज आहे. मी अशा भूमिकांच्या शोधात आहे. इंडस्ट्रीत फक्त 10 टक्के लोक असे असतात, जे तुमच्या चांगल्या कामावर मनापासून प्रेम करतात,' असेही तो म्हणाला.

मला याच मंचावर मरायचे आहे
श्रेयस आपल्या भावना व्यक्त करताना पुढे म्हणाला, 'एखाद्या सेटवर किंवा मंचावरच मला अभिनय करतच मरायचं आहे. जेव्हा जेव्हा मी निराश होतो तेव्हा मी स्वतःला समजावतो की निराश होऊ नको. तू तोच अभिनेता आहेस ज्याने 'इकबाल' केला आहे.'

बातम्या आणखी आहेत...