आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आपबिती:स्पेनमध्ये राहणारी श्रिया म्हणाली - नव-याला ताप आला म्हणून रुग्णालयात घेऊन गेली पण डॉक्टरांनी आम्हाला तिथून निघून जाण्याची विनंती केली 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका न्यूज वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत श्रियाने हे सांगितले.

स्पेनमध्ये पती आंद्रेई कोशीवसोबत राहणारी अभिनेत्री श्रिया सरन हिने तिच्यासोबत घडलेली एक धक्कादायक घटना शेअर केली आहे. श्रिया सरनने सांगितले की, तिच्या नव-याला कफ आणि तापाच्या तक्रारीनंतर तिने रुग्णालयात नेले. परंतु रुग्णालयात उपस्थित डॉक्टरांनी त्यांना तिथून निघून जाण्याची विनंती केली. एका न्यूज वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत श्रियाने हे सांगितले.

2018 मध्ये आंद्रेई आणि श्रियाचे लग्न झाले होते, तेव्हापासून श्रिया स्पेनमध्ये वास्तव्याला आहेत. स्पेन हा अशा देशांपैकी एक आहे जिथे कोरोनाव्हायरस संसर्ग खूप जास्त आहे. येथे 1 लाख 72 हजार 541 लोक संक्रमित आहेत आणि आतापर्यंत 18 हजार 56 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.

View this post on Instagram

True love #stayathome @andreikoscheev

A post shared by Shriya Saran (@shriya_saran1109) on Apr 9, 2020 at 10:06am PDT

श्रिया आणि आंद्रेईला डॉक्टरांनी दिला क्वारंटाईनचा सल्ला : श्रियाने सांगितले की, आंद्रेईला ताप आणि कोरड्या खोकल्याचा त्रास झाला होता. त्यामुळे आम्ही ताबडतोब रुग्णालयात गेलो, पण तेथील डॉक्टरांनी आम्हाला सांगितले की, तुम्ही लोक इथून निघून जा. इथली परिस्थिती अशी आहे की, जर त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला नसेल आणि ते येथेच राहिले तर त्यांना या विषाणूची लागण होईल. डॉक्टरांनी सांगितले की तुम्ही स्वत:ला क्वारंटाईन ठेवलं पाहिजे. त्यानंतर आम्ही परत घरी येण्याचा निर्णय घेतला.

आंद्रेई आणि मी सेल्फ डिस्टन्स ठेवत आहोतः श्रिया म्हणाली की, आपण लोकांनी स्वतःला सेल्फ आयसोलेट केले आहे. आंद्रेईवर घरी उपचार केले गेले. मी आणि आंद्रेई स्वतंत्र खोल्यांमध्ये झोपायचो आणि मी स्वतः दूर डिस्टन्स मेंटेन करायचो. आता आंद्रेईला बरे वाटत आहे आणि देवाच्या कृपेने वाईट काळ मागे गेला आहे.

लग्नाच्या वाढदिवशी समजले की परिस्थिती हाताबाहेर गेली आहे : 13 मार्च रोजी श्रीयाच्या लग्नाचा वाढदिवस होता. श्रियाने सांगितले, आम्ही एक रेस्तराँ बुक केले पण तिथे पोचल्यावर आम्हाला परिस्थितीची कल्पना आली. रेस्तराँ बंद होते. तेथील लोकांनी सांगितले की, परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. संपूर्ण स्पेनमध्ये लॉकडाऊन आहे. यानंतर सर्व काही बदलले. पोलिसांनी यानंतर नियम बनवला की, घरातील एकच व्यक्ती एकावेळी बाहेर पडू शकेल आणि तेही जेव्हा बाहेर पडणे फारच गरजेचे असेल. एकदा पोलिसांनी मला आणि आंद्रेईला अडवले होतं, कारण आंद्रेई गोरा आणि मी सावळ्या रंगाची आहे. त्यानंतर पोलिसांना समजले की, आम्ही दोघे पती-पत्नी आहोत.  

बातम्या आणखी आहेत...