आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीकृष्णाच्या भक्तीत तल्लीन झाली श्रिया सरन:शेअर केला शास्त्रीय नृत्याचा व्हिडिओ, चाहते म्हणाले- आमची लाडकी राधा राणी

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री श्रिया सरन तिच्या दमदार अभिनयासाठी तसेच उत्कृष्ट नृत्यासाठी ओळखली जाते. अलीकडेच श्रियाने सोशल मीडियावर एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये श्रिया गोकुळाष्टमीच्या निमित्ताने शास्त्रीय नृत्य करताना दिसतेय. श्रिया श्रीकृष्ण आराधना करताना या व्हिडिओत दिसतेय. व्हिडिओ शेअर करताना श्रियाने कॅप्शनमध्ये लिहिले, 'गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा, तुम्हा सर्वांना कृष्णाचे प्रेम मिळो.'लूकबद्दल बोलायचे झाले तर श्रिया गोल्डन आणि व्हाइट कलरच्या लेहेंग्यात अतिशय सुंदर दिसत आहे. तिचा लूक पाहून चाहत्यांनी कमेंट करत तिला राधा म्हटले आहे. श्रियाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर ती अलीकडेच साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआर आणि रामचरण यांच्यासोबत आरआरआर चित्रपटात दिसली होती. व्हिडिओ पहा...

बातम्या आणखी आहेत...