आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मन की बात:आईवडिलांचा घटस्फोट झाला तेव्हा सर्वात आनंदी होती श्रुती हासन, म्हणाली - 'एकत्र राहताना ते तेवढे खूश नव्हते, जेवढे घटस्फोट झाल्यानंतर आहेत'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सध्या घरी राहून काम करत आहे श्रुती

अभिनेत्री श्रुती हासन आपल्या आईवडिलांच्या घटस्फोटामुळे खुश झाली होती. ही गोष्ट तिने आता सांगितली आहे. श्रुतीने खुश होण्याचे कारण सांगितले. ती म्हणाली, दोन लोक जेव्हा सेाबत राहू शकत नाहीत. तेव्हा त्यांचे बळजबरी सोबत राहणे चांगले नाही. कमल हासन आणि सारिका यांनी 1988 मध्ये लग्न केले होते आणि लग्नाच्या जवळजवळ 16 वर्षांनी म्हणजे 2004 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता. त्यांना श्रुती आणि अक्षरा या दोन मुली आहेत.

  • सोबत नव्हे तर वेगळे राहून आनंदी आहेत दोघे

एका मुलाखतीत श्रुतीने सांगितले, 'मी माझ्या वडिलांच्या जास्त जवळची आहे. आईदेखील माझ्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. मात्र जेव्हा दोघांनी जेव्हा वेगळे होण्याचा निर्णय घेतला तर मी सर्वात जास्त आनंदी झाले होते. कारण ते आता आपले जीवन जगणार होते, त्यांच्या मर्जीने. ते दोघे खूपच सुंदर आणि चांगली व्यक्ती आहेत. आता ते आपापल्या आयुष्यात आनंदी आहेत त्यांना पाहून मीदेखील आनंदी आहे.'

श्रुती पुढे म्हणाली, 'दोघांच्या स्वभावाची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत पण एकमेकांसाठी ते ठीक नाहीत. यामुळे माणूस म्हणून त्यांच्यातील चांगुलपणा अजिबात कमी होत नाही. मी लहान असताना ते दोघे विभक्त झाले. एकत्र राहताना ते तेवढे खूश नव्हते, जेवढे घटस्फोट झाल्यानंतर आहेत."

सध्या घरी राहून काम करत आहे श्रुती
सध्या श्रुती आपल्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये बिझी आहे. अलीकडेच तिने घरातील एका भागाचे डबिंग स्टुडिओत रुपांतर केले आहे. लॉकडाउनपूर्वी श्रुती एका डिजिटल सीरिज आणि 'सालार' या चित्रपटाचे शूटिंग करत होती.

बातम्या आणखी आहेत...