आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री श्रुती हासन 35 वर्षांची झाली आहे. 28 जानेवारी 1986 रोजी चेन्नई येथे तिचा झाला होता. श्रुतीने 1999 मध्ये तिच्या करियरची सुरुवात केली होती. ती दक्षिण भारतीय सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. श्रुतीने 'डी-डे', 'रमैया वस्तावैय्या', 'गब्बर इज बॅक', 'वेलकम बॅक', 'रॉकी हँडसम' या हिंदी सिनेमांमध्ये काम केले आहे. 'देवी' या शॉर्ट फिल्ममध्येही ती दिसली होती. श्रुतीबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात...
आईवडिलांच्या लग्नाआधी झाला होता जन्म
श्रुती कमल हासन आणि सारिका या प्रसिद्ध कलाकारांची मुलगी आहे. तिचा जन्म तिच्या पालकांच्या लग्नाआधी झाला होता. वास्तविक, लग्नाआधी कमल हासन आणि सारिका लिव्ह इनमध्ये राहत होते. दरम्यान, सारिका गर्भवती झाली आणि तिने श्रुतीला जन्म दिल्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे 1988 कमल हासनशी लग्न केले होते. कमल हासन आणि सारिकाचे यांचे लग्न टिकले नाही आणि 2004 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. श्रुतीची धाकटी बहीण अक्षरा ही देखील अभिनेत्री आहे.
शाळेत ठेवले होते फेक नाव
वृत्तानुसार, श्रुती शाळेत असताना ती कमल हासन आणि सारिका यांची मुलगी आहे, हे इतरांना कळू नये म्हणून तिने आपले खरे नाव लपवले होते आणि फेक नावाने शाळेत शिक्षण घेतले होते. तिने आपले नाव पूजा रामचंद्रन ठेवले होते.
श्रुतीचे सुरुवातीचे शिक्षण चेन्नईच्या लेडी अंदल स्कूलमध्ये झाले. त्यानंतर तिने मुंबईच्या सेंट एंड्र्यू कॉलेजमधून सायकॉलॉजीची पदवी प्राप्त केली होती. संगीताची आवड असल्याने श्रुतीने कॅलिफोर्नियाच्या म्युझिशियन्स इंस्टिट्यूटमधून संगीताचे धडे गिरवले आणि त्यानंतर ती चेन्नईला परतली.
आईशी बोलणे झाले होते बंद
कमल हासनपासून घटस्फोट घेतल्यानंतर सारिका यांनी आपल्या दोन्ही मुलींच्या पालनपोषणात कोणतीही कसर शिल्लक ठेवली नाही. परंतु एक काळ असा होता की त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला होता. खरं तर श्रुतीचे तिच्या आईबरोबर खूप चांगले बॉन्डिंग होते पण जेव्हा श्रुतीने वडिलांच्या गर्लफ्रेंडसोबत मैत्री केली आणि तिच्यासोबत जास्त वेळ घालवू लागली, तेव्हा सारिका यांना ते आवडले नाही आणि त्यांनी तिच्याशी बोलणे बंद केले होते. काही वर्षांनी त्यांचे नाते सामान्य झाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.