आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • Shruti Modi Lawyer Update | Sushant Singh Rajput Death Case; Ashok Saraogi, Lawyer For Shruti Modi, Manager Of Sushant And Rhea Chakrabor

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत प्रकरणात नवीन खुलासा:श्रुती मोदीच्या वकिलांचा आरोप - सुशांतच्या दोन बहिणी ड्रग्ज पार्टीत सामील व्हायच्या; ड्रग्जमुळे करिअरला लागली होती उतरती कळा

मुंबई3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
सुशांत सिंह प्रकरणात श्रुती मोदीने वकील अशोक सरावगी (डावीकडे) यांना नियुक्त केले आले आहे. श्रुती मोदी सुशांतची मॅनेजर होती.
 • रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूत यांचे काम श्रुती मोदी पाहत होती, तिची नियुक्ती रियाने केली होती.
 • श्रुती मोदीची मुंबई पोलिस, ईडी आणि सीबीआयच्या टीमने चौकशी केली आहे, ती बर्‍याचदा रियाबरोबर राहत असे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्स अँगलवरुन रोज नवीन खुलासे होत आहेत. आता सुशांत आणि रिया चक्रवर्ती यांची मॅनेजर राहिलेली श्रुती मोदी हिचे वकील अशोक सरावगी यांनी दावा केला आहे कीस सुशांतच्या दोन बहिणी ड्रग्ज पार्ट्यांमध्ये सहभागी होत असत. काही दिवसांपूर्वी ईडीने रियाच्या दोन फोनची क्लोनिंग केली होते. त्या रिट्रीव्ह चॅट्समधून ड्रग्ज अँगल उघडकीस आला, त्यानंतर गोव्यातील हॉटेल व्यावसायिक गौरव आर्यला ईडीने आज चौकशीसाठी बोलवले आहे.

 • सुशांत ड्रग्ज घ्यायचा याची त्याच्या कुटुंबाला माहिती होती

एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सरावगी यांनी दावा केला आहे की, सुशांतच्या बहिणी ड्रग्ज पार्टीत सहभागी व्हायच्या. ते म्हणाले की, मुंबईत राहणारी सुशांतची बहीण मद्यपान करते. ती याची शौकीन आहे. सुशांतच्या ड्रग्ज व्यसनाविषयी त्याच्या कुटुंबीयांना माहित होते, असेही त्यांनी म्हचले आहे.

 • व्हॉट्सअॅप ग्रुपमधील प्रत्येकजण ड्रग्ज घेत असे

अशोक सरावगी म्हणाले- व्हॉट्सअ‍ॅपवर एक ग्रुप होता, ज्यामध्ये ड्रग्ज घेण्यावर चर्चा व्हायची. त्या ग्रुपमधील सुशांत आणि रियाशि व्यतिरिक्त सोहेल (ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड), मित्र आयुष शर्मा, आनंदी हे सर्वजण अधूनमधून सुशांतच्या घरी थांबून ड्रग्ज घेत असत. त्या ग्रुपमधील प्रत्येकजण ड्रग्ज घेत असे. मॅनेजर श्रुती मोदील हिलादेखील या लोकांनी ड्रग्ज घ्यायला सांगितले होते, मात्र तिने यासाठी नकार दिला. श्रुती म्हणाली होती की, जर तिला पुन्हा विचारले गेले तर ती बा ग्रुप सोडून देईल. म्हणून तिला पुन्हा विचारण्यात आले नाही.

 • सुशांतला खर्चाची चिंता होती

अशोक सरावगी यांनी सांगितल्यानुसार, सुशांत त्याच्या होणा-या खर्चाबद्दल खूप चिंतीत होता आणि त्याला लवकरच खर्च कमी करायचे होते. रियाने सुशांतच्या खर्चासंदर्भात 11 जानेवारी रोजी बैठकही बोलावली होती, त्यात सुशांत सहभागी झाला नव्हता. पण त्या मिटींगची रेकॉर्डिंग केली गेली, ज्या नंतर सुशांतने ती ऐकली होती.

 • सुशांतसाठी रेस्तराँ उघडण्याची फॅमिलीची इच्छा होती

अशोक सरावगी म्हणतात की, सुशांतला माहित होते की त्याचा खर्च खूप जास्त आहे आणि म्हणूनच तो काळजीत होता. तो त्याच्या पैशांबद्दल खूप असुरक्षित होता. त्याच्या कुटुंबीयांची इच्छा होती की त्याने (सुशांत) परत यावे, कारण ते त्याच्यासाठी एक रेस्तराँ सुरु करणार होते. मात्र सुशांतला ते मान्य नव्हते.

 • ड्रग्जच्या व्यसनाचा परिणाम सुशांतच्या करिअरवर झाला

सुशांतच्या करिअरवर ड्रग्जच्या व्यसनाचा मोठा परिणाम होत असल्याचे श्रुतीच्या वकिलांनी सांगितले. जानेवारीमध्ये एक कंपनी सुशांत त्यांचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवणार होती, पण त्यावेळी तो मुंबईत नव्हता, म्हणून कंपनीने सुशांतला 50% पैसे देणार असल्याचे सांगून त्याचे जुने फोटो मागितले होते. मात्र सुशांतला ही डील मान्य नव्हती. आणि त्याने मुंबईत येऊन काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. पण, तो मुंबईत आल्यानंतर त्याची प्रकृती पाहून कंपनीने ही ऑफर रद्द केली. त्यावेळी सुशांतची प्रकृती ठीक नव्हती.

 • श्रुतीने बहीण मितूला सुशांतच्या डिप्रेशनविषयी सांगितले होते

यापूर्वी रविवारी श्रुती मोदी आणि सुशांतची बहीण मितू सिंह यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट समोर आले आहेत. सुशांत डिप्रेशनमध्ये होता हे त्याच्या बहिणीला माहित होते हे चॅटमधून दिसून येते. या चॅटमध्ये श्रुतीने डॉक्टरांचा नंबर आणि सुशांतला लिहून दिलेल्या औषधांची नावेही मितूला सांगितली आहेत. या चॅटच्या स्क्रीनशॉटमध्ये श्रुतीशी बोलताना मितू स्वत: डॉक्टरांना भेटण्याविषयी म्हणाली होती.

हे चॅट 26 नोव्हेंबर 2019 रोजीचे आहेत. या चॅटमध्ये डॉक्टरांनी सुशांतला दिलेल्या 10 दिवसांच्या मेडिसिनचे प्रिस्क्रिप्शनही श्रुतीने शेअर केले आहे. या चॅटमध्ये त्याच्या बहिणी मितूचे नाव नीतू दीदी असे लिहिले आहे.

 • 8 जूनपासून सुशांत मितूसोबत होता

रियाने सुशांतचे घर सोडल्यानंतर 8 ते 13 जून दरम्यान मितू सुशांतसोबत होती. सुशांतचे वागणे, संवाद आणि मानसिक स्थिती याकाळात कशी होती याविषयी सीबीआय मितूला विचारू शकते. मितू आणि सर्व आरोपींना समोरासमोर बसवून चौकशी केली जाऊ शकते असेही वृत्त आहे. यापूर्वी रियाने सुशांतची बहीण प्रियंकावर आरोप केले होते की तिने मद्यपान करुन तिच्यासोबत गैरवर्तन केले होते. याबाबत सीबीआय प्रियंका आणि तिचा नवरा सिद्धार्थ यांचीही चौकशी करण्याची शक्यता आहे.