आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल आणि अभिनेत्री सारा अली खान रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगत आहेत. पण साराने शुभमन गिलसोबतच्या डेटिंगच्या चर्चा अफवा असल्याचे अनेकदा म्हटले आहे. आता सारा आणि आणि शुभमन गिल पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत. दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. दोघांचा हा फोटो अहमदाबाद विमानतळावरील असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र हा फोटो जुना आहे की आताचा हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सारा आणि शुभमनचा फोटो समोर आला आहे
हा फोटो एका युजरने सोशल मीडियावर शेअर केला. यामध्ये सारा क्रिकेटर शुभमन गिलसोबत अहमदाबाद विमानतळावर गप्पा मारत वेळ घालवताना दिसत आहे. व्हायरल फोटो पाहून यूजर्स सारा आणि शुभमन एकमेकांना डेट करत असल्याचा दावा करत आहेत.
सारा-शुबमन रेस्तराँमध्ये झाले होते पहिल्यांदा स्पॉट
काही महिन्यांपूर्वी शुभमन आणि सारा एका रेस्तराँमध्ये डिनर करताना दिसले होते, दोघांचे फोटो समोर आल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्या लिंकअपच्या बातम्या समोर आल्या होत्या. यानंतर काही दिवसांतच सारा आणि शुभमन दिल्लीतदेखील एका हॉटेलबाहेर स्पॉट झाले होते. दोघांचे फोटो आणि व्हिडिओ खूप चर्चेत होते.
साराला डेट करण्याच्या बातमीवर शुभमनची प्रतिक्रिया
काही दिवसांपूर्वी शुभमन गिल सोनम बाजवाचा पंजाबी चॅट शो 'दिल दियां गल्लान'मध्ये सहभागी झाला होता. अभिनेत्री सोनम बाजवाने शुभमन गिल याला साराला डेट करण्याबद्दल विचारले, तेव्हा त्याने सांगितले की कदाचित मी तिला डेट करत आहे. जेव्हा सोनम म्हणाली की साराबद्दल संपूर्ण सत्य सांगा, तेव्हा शुभमन चुटकीसरशी– साराचे सर्व सत्य सांगितले आहे असे म्हटले.
'आमची वहिनी कशी असावी, सारा वहिनींसारखी असावी'
सारा आणि शुभमन गिल यांच्यात काहीतरी सुरू असल्याची झलक विराट कोहलीच्या व्हिडिओवरून समोर आली आहे. हा व्हिडिओ एका सामन्यादरम्यानचा आहे, व्हिडिओत स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले पाहायला मिळाले. विराट कोहली समोर मैदानात आहे. अचानक प्रेक्षकांमधून शुभमन गिल आणि सारा अली खान यांच्या नावाच्या घोषणा व्हिडिओत ऐकू येऊ लागल्या. त्यामध्ये आमची वहिनी कशी असावी, सारा वहिनींसारखी असावी.' अशा घोषणा प्रेक्षक देऊ लागताच विराट कोहलीने प्रेक्षकांना जोरात बोलण्याचे संकेत दिले. विराट कोहलीचा हा व्हिडिओ अजूनही चर्चेत आहे.
सारा तेंडुलकरसोबतही जोडले गेले आहे शुभमनचे नाव
सारा अली खानपूर्वी शुभमनचे नाव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबतही जोडले गेले आहे. दोघेही अनेकदा एकमेकांच्या फोटोंवर कमेंट करताना दिसले होते, त्यानंतर दोघांच्या लिंक-अपची चर्चा रंगली होती. मात्र, आता दोघांनी एकमेकांना अनफॉलो केले आहे, त्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शुभमन गिल हा आपल्या फलंदाजीसाठी ओळखला जातो. शुभमन याने न्यूझीलंडविरुद्ध टी-20 सामन्यात शतक झळकावले तेव्हा सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट झाला होता. तेव्हापासून तो देशातील जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.