आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचे तिची नणंद श्वेता बच्चन नंदासोबत खूप चांगले बॉन्डिंग आहे. पण आपल्या वहिनीची एक सवय श्वेताला मुळीच आवडत नाही. स्वतः श्वेताने करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये याचा उल्लेख केला होता. श्वेता म्हणाली होती, "कधीही वहिनी फोन करा, जर ती काही कारणास्तव फोन उचलू शकली नाही तर बॅक कॉलदेखील करत नाही. तिचे टाइम मॅनेजमेंट खूप खराब आहे आणि मला तिची ही सवय मुळीच आवडत नाही."
गायिका तुलसी कुमार पहिल्यांदाच टॉक शोचे सूत्रसंचालन करणार आहे. त्याचे नाव ‘इंडी है हम-2’ असे आहे. याचे पहिले सीझन गायिका दर्शन रावलने होस्ट केले होते. शोच्या सूत्रसंचालनामुळे तुलसी खूपच खुश आहे. याविषयी ती म्हणाली, या कार्यक्रमाचा भाग बनल्याने आभारी आहे. सूत्रसंचालनाची भूमिका माझ्यासाठी खूपच नवी आहे. निश्चित रूपाने याचा आनंद घेऊ इच्छित आहे. हा शो संगीताला प्रोत्साहन देणारा आहे.
डान्स रिअॅलिटी शो ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ शो लवकरच सुरू होणार आहे. या शोमध्ये यंदाही शिल्पा शेट्टी परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्यासोबत अनुराग बसू आणि कोरियोग्राफर गीता कपूर दिसतील. एका पाठोपाठ तीन यशस्वी सीजन्समध्ये नृत्य कौशल्याचे प्रोत्साहन केल्यानंतर शिल्पा पुन्हा एकदा परीक्षण करण्यासाठी उत्सुक आहे. या शोचे व्हर्चुअल ऑडिशन्स 26 जानेवारी रोजी झाले. डिजिटल ऑडिशन्समध्ये निवडलेले स्पर्धक स्टुडिओ राउंडसाठी मुंबईला जातील. तेथे ते परीक्षकांसमोर आपली प्रतिभा दाखवतील.
अभिनेत्री आदिती राव हैदरी हिने अलीकडेच एक ब्राइडल फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये आदितीने, डिझायनर सब्यसाची मुखर्जीचे ब्रायडल आणि ज्वेलरी कलेक्शन सादर केले.
जान्हवी कपूर सध्या आपल्या आगामी ‘गुड लक जेरी’च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. चंदीगडमध्ये ती या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. अलीकडेच तिचा शूटिंग सेटवर क्रिकेट खेळताचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर तिने मंगळवारी एका किल्ल्याचा फोटो शेअर केला. शूटिंगमधून ब्रेक घेत ती किल्ल्यावर गेली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.