आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा हिने अलीकडेच एका मुलाखतीत आपल्या मुलांबाबत भाष्य केले. संभाषणादरम्यान श्वेताने कबूल केले की, तिने आपल्या दोन्ही मुलांचे संगोपन सारखे केलेले नाही. ती कायम मुलगी नव्याबाबत कठोर राहिली आहे.
महिलांनी सशक्त आणि सतर्क असले पाहिजे - श्वेता बच्चन
पत्रकार बरखा दत्तला दिलेल्या मुलाखतीत श्वेताला ती तिचा मुलगा अगस्त्यापेक्षा तिची मुलगी नव्याबद्दल जास्त कडक आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर श्वेताने सहमती दर्शवली आणि म्हणाली- मी नव्याबाबत कठोर आहे, कारण मला वाटते की हे जग स्त्रियांसाठी इतके सोपे नाही. म्हणूनच तुम्ही तितकेच खंबीर, सतर्क आणि सावध असले पाहिजे.
नव्या आणि अगस्त्या या दोघांचा स्वभाव खूप वेगळा आहे - श्वेता बच्चन
श्वेता पुढे म्हणाली- 'नव्या आणि अगस्त्या या दोघांचा स्वभावही खूप वेगळा आहे. मला वाटतं अगस्त्य खूप मॅच्युअर आहे. तर नव्या थोडी भोळी आहे आणि माझा तिच्या खास मित्रांवर आणि जवळच्या लोकांवर फारसा विश्वास नाही. मी गोष्टींबद्दल थोडी काळजी घेते आणि तिच्याशी बोलते.'
'हो पण यासोबतच तिला तिचे आयुष्य तिच्या मनासारखे जगण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे,' असेही श्वेता म्हणाली.
नव्याचा स्वभाव माझ्या आईसारखा आहे - श्वेता बच्चन
नव्याच्या स्वभावाची आई जयाशी तुलना करताना श्वेता म्हणाली- 'मला वाटते की माझ्या आईकडून नव्याला खूप काही मिळाले आहे. त्यांच्याप्रमाणेच नव्याचाही दृढ विश्वास आहे, जो तोडणे फार कठीण आहे. ती तिच्या गोष्टींबद्दल खूप पॅशनेट आहे. तिचा विश्वास असलेल्या मुद्द्यांवर ती मोकळेपणाने बोलते. मी खूप लाजाळू आहे आणि हे सर्व माझ्यासारख्या व्यक्तीसाठी चांगले नाही.'
नव्याची आईकडे असते भेदभावाची तक्रार
काही काळापूर्वी नव्याने 'शी दा पीपल'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, मुलगी असल्यामुळे माझ्यासोबत घरात अनेकदा भेदभाव झाला आहे. ती म्हणाली होती, 'मी माझ्या घरी हे घडताना पाहिले आहे, जेव्हाही कोणी पाहुणे यायचे तेव्हा माझी आई मलाच काहीतरी काम सांगायची. माझ्या भावासोबत असे घडले नव्हते. कायम मलाच पाहुण्यांचे स्वागत करावे लागले.'
पुढे ती म्हणाली होती की, 'पाहुणे आले की होस्टिंगची जबाबदारी घरातील मुले पार पाडतात, असे मी कधी पाहिले नाही. किंबहुना अशी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जाते, तेव्हा ते त्याकडे सपशेल दुर्लक्ष करतात. मुलांवरच्या जबाबदारीबद्दलच्या अशा अनौपचारिक दृष्टिकोनातून हे स्पष्ट होते की, घराची काळजी घेण्याची जबाबदारी मुलींवरच असते, हे घरातील मुलींच्या मनात पुर्वीपासून बिंबवले जाते.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.