आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा2002 मध्ये ‘मकडी’ मधून बालकलाकार म्हणून आपल्या सिने कारकीर्दीची सुरुवात करणारी अभिनेत्री श्वेता बसू प्रसाद आता मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये दिसत आहे. इतके महिने लॉकडाऊमध्ये राहिल्यानंतर या वर्षी श्वेताचे जवळजवळ पाच प्रोजेक्ट रिलीज होणार आहेत. तिची सिरीज 'होस्टेज-2’ ती 9 सप्टेंबरपासून डिस्ने प्लस हॉटस्टारवर सुरू झाली. श्वेतासोबत झालेला संवाद -
मी खूपच खूश आहे. मी होस्टेज-1 पाहिली होती. ती खूपच आवडली होती. मी तर प्रेक्षक म्हणून ती पाहण्यासाठी वाट पाहत होते की, याचा दुसरा सीझन कधी येईल, पण मला ऑडिशनसाठी फोन आला. आणि ऑडिशन दिली. यात माझ्या पात्राचे नाव शिखा आहे, ती एक इंटेलिजन्स ब्युरो अधिकारी आहे. रोनित रॉयसारखे हे पात्र आहे.
मी प्रत्येक पात्राच्या पार्श्वभूमीवर जास्त लक्ष देते, तो कुठून आला, तो कोठे मोठा झाला, कोणत्या वातावरणाशी संबंधित आहे. त्यांच्याबद्दल या सर्व गोष्टींची कल्पना करते. शिखा इंटेलिजन्स ऑफिसर आहे. माझे आजोबादेखील आयबी अधिकारी हाेते, म्हणून माझ्या स्वत:साठी ही एक चांगली संधी आहे, आजोबांना श्रद्धांजली वाहण्याचा.
‘द ताश्कंद फाइल’ नंतर मला बऱ्याच भूमिका ऑफर झाल्या. खरं तर ही सिरीजदेखील मला ताश्कंद फाइल नंतरच मिळाली. याचे दिग्दर्शक सचिन यांनी मला ताश्कंदमध्ये पाहिले होते. त्यांना माझे काम आवडले आणि त्यांनी मला फोन केला. शिवाय इतर लोकांनीही फोन केले आहेत.
हो, मला मकडीसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तेव्हा मी 12 वर्षांची होते. त्यानंतर 2005 मध्ये मी ‘इकबाल’ नावाचा चित्रपट केला. त्यानंतर मला राजकुमार संतोषीचा ‘हल्ला बोल’ आणि त्यानंतर मधुर भांडारकरच्या ‘ट्रॅफिक सिग्नल’ सह अनेक मालिका आणि जाहिरातीच्या ऑफर आल्या. मात्र मी अाधी शिक्षण पूर्ण करावे अशी आई-वडिलांची इच्छा होती. त्यामुळे मी साऱ्यांना नकार दिला. पदवीपर्यंत काहीच काम केले नाही. मी मास मीडिया आणि जर्नालिझमची पदवी घेतली आहे. त्यानंतर मी माहितीपट बनवला, तो नेटफ्लिक्सवर आहे. अनुराग कश्यपसोबत काम केले. माहितीपटही बनवला. याशिवाय स्क्रिप्ट देखील लिहिली आहे.
यावर्षी माझे पाच प्रोजेक्ट रिलीज होणार आहेत. फेब्रुवारीमध्ये ‘शुक्राणु’ चित्रपट झी 5वर रिलीज झाला. आता मी एक चित्रपट ‘कॉमेडी कपल’चे शूटिंग गुरगावमध्ये पूर्ण केले. शिवाय एक चित्रपट आणि दोन वेब सिरीजवर काम सुरू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.