आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शक्तिमान झालेल्या सिद्धांत चतुर्वेदीची झाली फजिती:म्हणाला- माझी पॅन्ट फाटली म्हणून गंगाधर व्हावे लागेल

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी अलीकडेच हॅलोविन पार्टीत शक्तिमानच्या रुपात दिसला. सिद्धांतने त्याच्या इंस्टाग्रामवर एक बीटीएस (बिहाइंड द सीन) व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्याने त्याचा अनुभव कसा होता हे त्याने सांगितले आहे. सूट-कोट, चष्मा, हातामध्ये सूटकेस बॅग अशा गंगाधरच्या अवतारामध्ये तो कॅमेऱ्यासमोर येतो. काही सेकंदानंतर तो हातामध्ये असलेली बॅग आणि डोळ्यावरील चष्मा फेकून हात वर करुन पोझ देतो आणि त्यानंतर लगेच तो शक्तिमानच्या कपड्यांमध्ये दिसतो. या ट्रान्सफॉर्मेशननंतर त्याच्या चित्रीकरणामधले काही सीन्स पाहायला मिळतात. तेव्हा तो 'बघू नकोस, पॅन्ट फाटली आहे’, असे म्हणत हातामधली फाटलेली पॅन्ट दाखवतो. पुढे कॅमेरा जवळ येत असल्याचे लक्षात आल्याने तो 'तू बीटीएस काय घेत आहेस शक्तिमानची पॅन्ट फाटली, त्यामुळे मला मध्येच गंगाधर बनावे लागते आहे', असे म्हणतो. ‘सॉरी शक्तिमान’ असे कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिले आहे.

सिद्धांत चतुर्वेदीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याच्या चाहत्यांना त्याचा हा व्हिडिओ खूप आवडला आहे. सिद्धांत लवकरच 'फोन भूत' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफ आणि ईशान खट्टर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पाहा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...