आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Childhood Starred In Salman's 'Judwaa', Became A DJ After A Flop In The MovieSiddhant Kapoor: In Childhood, Twins Were Seen In The Film, Debut Film Was Closed, Then Became Assistant Director, Became DJ, Earlier Also Arrested From Rave Party

कोण आहेत सिद्धांत:बालपणी झळकला होता सलमानच्या 'जुडवा'मध्ये, सिनेसृष्टीत फ्लॉप ठरल्यानंतर बनला DJ

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2013 मध्येही ड्रग्ज स्कँडलमध्ये झाली होती अटक

बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांचा मुलगा आणि श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत याला बंगळुरू पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बंगळुरू येथील हॉटेल पार्कमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीतून सिद्धांतला ताब्यात घेण्यात आले आहे. ड्रग्ज चाचणी केल्यानंतर, सिद्धांतसह इतर 6 जणांनी ड्रग्जचे सेवन केल्याची पुष्टी झाली आहे. या पार्टीत तो डीजे म्हणून सहभागी झाला होता. हा तोच सिद्धांत आहे ज्याने 1997 मध्ये आलेल्या 'जुडवा' या चित्रपटातून बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. जवळपास 15 चित्रपटांमध्ये तो झळकला आहे. पण चित्रपटांपेक्षा ड्रग्ज प्रकरणामुळे तो जास्त चर्चेत राहिला आहे.

2013 मध्येही ड्रग्ज स्कँडलमध्ये झाली होती अटक
सिद्धांत कपूरला 2013 मध्ये जुहू येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीतून पोलिसांनी अटक केली होती. पार्टीतून मोठ्या प्रमाणात एमडीएमए आणि कोक जप्त करण्यात आला होता. या पार्टीत सिद्धांतला डीजे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. अटक केल्यानंतर सिद्धांतची ड्रग टेस्ट झाली होती. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर सिद्धांतला सोडून देण्यात आले होते.

बालकलाकार म्हणून चित्रपटात पाऊल ठेवले

सिद्धांत कपूरने वयाच्या 13 व्या वर्षी पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवले होते. 1997 मध्ये आलेल्या 'जुडवा' चित्रपटातून त्याने पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याने ज्युनियर रंगीला ही भूमिका साकारली होती.

प्रियदर्शन यांच्यासोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केले काम

वयाच्या 21 व्या वर्षी सिद्धांतने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली. प्रियदर्शन दिग्दर्शित भूल भुलैया, भागम भाग, ढोल, चुप चुपके या चित्रपटांमध्ये तो सहाय्यक दिग्दर्शक होता.

एका मोठ्या चित्रपटातून पदार्पण करणार होता, पण पहिला चित्रपट थांबला

2012 मध्ये सोहम शाह दिग्दर्शित 'सत्ते पे सत्ता' या चित्रपटातून सिद्धांत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होता. हा चित्रपट राज सिप्पी यांचा सुपरहिट चित्रपट 'सत्ते पे सत्ता'चा रिमेक असणार होता, पण हा चित्रपट रखडला. पहिला चित्रपट थांबल्यानंतर त्याने 2013 मध्ये 'शूटआउट अॅट वडाला'मध्ये काम केले होते.

11 चित्रपटांमध्ये झळकला

अगली, जज्बा, हसीना पारकर, पलटन यांसारख्या जवळपास 11 चित्रपटांमध्ये सिद्धांत दिसला आहे. चित्रपटांव्यतिरिक्त त्याने भौकाल या वेब सीरिजमध्येही काम केले आहे. चित्रपटांव्यतिरिक्त सिद्धांत गेल्या अनेक वर्षांपासून डीजे म्हणूनही काम करतो.

बातम्या आणखी आहेत...