आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटीव्ही अभिनेता सिद्धांत सूर्यवंशी अनंतात विलीन झाला आहे. सांताक्रूझ पोलिस स्टेशनजवळील स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आले. यावेळी टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक जण त्याला अखेरचा निरोप देण्यासाठी हजर होते. वयाच्या 46 व्या वर्षी सिद्धांतने या जगाचा कायमचा निरोप घेतला.
शुक्रवारी जिममध्ये व्यायाम करत असताना सिद्धांतला हृदयविकाराचा झटका आला होता. त्याला तातडीने कोकिलाबेन रुग्णालयात नेण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी त्याचे पार्थिव कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधून गोरेगावच्या सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टमसाठी हलवण्यात आले होते. शनिवारी थेट रुग्णालयातून त्याचे पार्थिव अंत्यविधींसाठी स्मशानभूमीत नेण्यात आले. अखेरचे त्याला घरी नेण्यात आले नाही.
जवळच्या मित्रांनी व्यक्त केला शोक
सिद्धांतच्या अकाली निधनाने इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. 'जिद्दी दिल माने ना' या त्याच्या शेवटच्या शोचे सहकलाकार अंगद हसिजा आणि कुणाल करण कपूर यांनी दिव्य मराठीशी संवाद साधताना सिद्धांतच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.
जिम करत असताना बिघडली तब्येत
जिममध्ये व्यायाम करत असताना सिद्धांत सूर्यवंशीला हृदयविकाराचा झटका आला. अंगद हसिजा म्हणाला, 'सिद्धांताची बातमी ऐकल्यानंतर पहिला विचार आला की तुम्ही कितीही फिट असले तरी जे घडायचे असते तेच घडते. सिद्धांत त्याच्या फिटनेसवर खूप लक्ष द्यायचा. यासोबतच तो त्याच्या आहाराबाबतही खूप जागरुक होता. मी त्याच्याबद्दल जे काही पाहिले किंवा ऐकले आहे त्यानुसार, तो त्याच्या फिटनेसवर खूप मेहनत घेत असे. त्याचे असे अचानक निघून जाणे आम्हाला सर्वांना धक्का देणारे आहे.'
दुसरीकडे सिद्धांतचा सह-अभिनेता कुणाल करण कपूर म्हणतो, 'सिद्धांत खूप चांगला माणूस होता, अजूनही विश्वास बसत नाही की तो आता आपल्यात नाही. फिटनेसच्या बाबतीत तो आम्हा सर्व कलाकारांसाठी प्रेरणास्थानी होता. तो कितीही थकला असला तरी त्याने त्याची जिम कधीच चुकवली नाही. त्याच्या निधनाने आम्हा सर्वांना धक्का बसला आहे.'
अनेक टीव्ही मालिकांमध्ये केले काम
सिद्धांत वीर सूर्यवंशीचा जन्म 15 डिसेंबर 1975 रोजी मुंबईत झाला. त्याने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. सिद्धांतने 'कुसुम' या मालिकेतून टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. याशिवाय त्याने 'कसौटी जिंदगी की', 'कृष्णा अर्जुन', 'क्या दिल में है' सारख्या अनेक लोकप्रिय टीव्ही शोमध्ये काम केले. 'ममता' (2006), 'जमीन से आसमान तक' (2004), 'विरूद्ध' (2007), 'भाग्यविधाता' (2009), 'ये इश्क हाय' (2010), 'हमने ली है शपथ' (2012), 'सूर्यपुत्र कर्ण' (2015), 'वारिस' (2016) हे देखील त्याचे गाजलेले शोज आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.