आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'कुसूम' या गाजलेल्या मालिकेतून टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण करणारा अभिनेता सिद्धांत सूर्यवंशी उर्फ आनंद सूर्यवंशीचे आज हृदयविकाराच्या झटक्यान निधन झाले. त्याच्या निधनाने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. जिममध्ये वर्कआउट करताना सिद्धांतला हृदयविकाराचा झटका आला. त्याला तातडीने मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी जवळपास तासभर त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, पण त्यांना यश आले नाही. सिद्धांत 46 वर्षांचा होता. त्याच्या पश्च्यात त्याची पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
पाच वर्षांपूर्वीच केला होता दुसरा विवाह
सिद्धांतचे खरे नाव आनंद सूर्यवंशी होते. 2014 मध्ये काही कारणास्तव त्याने आपले नाव बदलून सिद्धांत सूर्यवंशी केले होते. 23 नोव्हेंबर 2017 रोजी त्याने त्याची लाँग टाइम गर्लफ्रेंड अलेसिया राऊतसोबत लग्न केले होते. दोघांचेही हे दुसरे लग्न होते.
सुपरमॉडेल आहे अलेसिया..
भारतीय वडील आणि रशियन आईची मुलगी असलेली अलेसिया प्रसिद्ध सुपर मॉडेल, वीजे आणि फॅशन कोरिओग्राफर आहे. अलेसियाने अनेक फॅशन शोजमध्ये फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राचे डिझाइन्स रिप्रजेंट केले आहेत.
याशिवाय ती फेमिना मिस इंडिया आणि मिस इंडिया यूनिव्हर्स या सौंदर्य स्पर्धेत सहभागी झाली होती. सोबतच ती 'फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडी' सीझन-4 मध्येही झळकली होती. अलेसियाचे पहिले लग्न रशियन इकॉनॉमिस्टसोबत झाले होते. पण फार काळ त्यांचे लग्न टिकले नव्हते. तिला पहिल्या लग्नापासून 15 वर्षांचा एक मुलगा आहे.
17 वर्षांच्या मुलीचा बाबा होता आनंद
आनंदचे पहिले लग्न इरा सूर्यवंशीसोबत झाले होते. पण फार काळ त्यांचा संसार टिकला नाही. पहिल्या लग्नापासून सिद्धांतला एक मुलगी असून ती आता 17 वर्षांची आहे. लग्नाच्या वेळी एका मुलाखतीत सिद्धांत म्हणाला होता, "माझी मुलगी माझ्या दुस-या लग्नामुळे खूप आनंदी आहे. ती आमच्या संगीत सेरेमनीत परफॉर्म करणार आहे. लग्नासाठी तिने शाळेतून सुटी घेतली आहे."
या शोजमध्ये झळकला होता सिद्धांत..
सिद्धांतने 'कुसुम' या मालिकेतून टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. याशिवाय त्याने 'कसौटी जिंदगी की', 'कृष्णा अर्जुन', 'क्या दिल में है' सारख्या अनेक लोकप्रिय टीव्ही शोमध्ये काम केले. 'ममता' (2006), 'जमीन से आसमान तक' (2004), 'विरूद्ध' (2007), 'भाग्यविधाता' (2009), 'ये इश्क हाय' (2010), 'हमने ली है शपथ' (2012), 'सूर्यपुत्र कर्ण' (2015), 'वारिस' (2016) हे देखील त्याचे गाजलेले शोज आहेत.
लोकप्रिय टीव्ही अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी याचे निधन झाले आहे. 46 वर्षीय सिद्धांतला जिममध्ये वर्कआऊट करत असताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते. डॉक्टरांच्या टीमने तब्बल 45 मिनिटे शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्याचे प्राण वाचवता आले नाही. वाचा सविस्तर...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.