आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिताली-सिद्धार्थची स्वप्नपुर्ती:सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली यांनी मुंबईत खरेदी केला आशियाना, खास फोटो शेअर करत म्हणाले - 'एक नवी सुरुवात...'

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मिताली आणि सिद्धार्थने स्वप्ननगरी मुंबईत नवीन घर खरेदी केले आहे.

मराठी मनोरंजनविश्वातील क्यूट कपल सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या दोघांनी नुकतीच त्यांच्या चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. या दोघांनी त्यांच्या स्वप्नपूर्तीबद्दल चाहत्यांना सांगितले आहे. दोघांनीही सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर स्वप्ननगरी मुंबईत नवीन घर खरेदी केल्याची गोड बातमी सगळ्यांना दिली आहे.

सिद्धार्थ आणि मिताली यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत दोघांच्याही अंगठ्याला शाई लागलेली दिसत आहे. सोबतच त्यांनी हटके कॅप्शनही दिले आहे. सिद्धार्थने फोटो शेअर करत, “एक नवी सुरुवात… मुंबईतील आमचे पहिले घर”, असे कॅप्शनमध्ये म्हटले आहे. त्यासोबत त्याने #tinypandahouse असा हॅशटॅगही शेअर केला आहे.

मितालीने देखील फोटो शेअर करत असेच कॅप्शन दिले आहे. पण त्यांचे हे नवीन घर मुंबईत कुठे आहे, याबाबत त्यांनी काहीही सांगितलेले नाही. या बातमीनंतर चाहते आणि इंडस्ट्रीतील मित्रमंडळी या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

वर्षभरापूर्वी झाले लग्न
सिद्धार्थ आणि मिताली यांनी 24 जानेवारी 2021 रोजी लग्न केले. लग्नापूर्वी दोघेही जवळपास दोन वर्ष हे दोघे लिव्ह इनमध्ये राहिले. 2019 मध्ये या दोघांचा साखरपुडा पार पडला होता. 2018 मध्ये व्हॅलेंटाइन डेला मिताली आणि सिद्धार्थ यांनी त्यांच्या नात्याची सार्वजनिकरित्या कबुली दिली होती. सिद्धार्थ-मितालीच्या केळवणापासून, हळद, संगीत ते अगदी लग्नसोहळ्यापर्यंतचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

बातम्या आणखी आहेत...