आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धार्थ-कियारा चंदीगडमध्ये चढणार बोहल्यावर:द ओबेरॉय सुखविला रिसॉर्टमध्ये थाटू शकतात दोघेही लग्न

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. दरम्यान, आता लग्नाबाबत आणखी एक नवीन अपडेट समोर आले आहे. दोघेही लग्नासाठी चंदीगडमधील एका भव्य लोकेशनच्या शोधात असल्याचे बोलले जात आहे.

द ओबेरॉय सुखविला रिसॉर्टमध्ये दोघे करु शकतात लग्न
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, सिद्धार्थ मल्होत्राच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, “दोघेही एका महिन्यापासून लग्नाचे ठिकाण शोधत होते. कियारा आणि सिद्धार्थ सध्या चंदीगडमध्ये एका लक्झरी प्रॉपर्टीच्या शोधात आहेत. लग्नासाठी चंदीगडमधील द ओबेरॉय सुखविला स्पा आणि रिसॉर्ट त्यांच्या पसंतीस पडले आहे. याच रिसॉर्टमध्ये राजकुमार राव आणि पत्रलेखाचे लग्न झाले होते.'

पहिले गोव्यात होणार होते लग्न
सूत्राने पुढे सांगितले की, 'आधी दोघेही गोव्यात लग्न करण्याचा विचार करत होते, परंतु सिद्धार्थचे मोठे पंजाबी कुटुंब आहे, ज्यामुळे त्याने गोव्यात लग्न करण्याचा निर्णय रद्द केला.'

लग्नानंतर मुंबईत रिसेप्शन देणार
बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार कियारा आणि सिद्धार्थने डिसेंबरमध्ये त्यांच्या लग्नाची तारीख लॉक केली आहे. लग्नानंतर दोघेही मुंबईत रिसेप्शन पार्टी ठेवणार असल्याचे बोलले जात आहे, ज्यात करण जोहरसह अनेक बॉलिवूड स्टार्स उपस्थित राहणार आहेत. दोघेही त्यांचे लग्न सीक्रेट ठेऊ इच्छितात. त्यामुळे लग्नाची पूर्ण तयारी केल्यानंतरच ते अधिकृत घोषणा करतील.

दोघेही 'शेरशाह'मध्ये एकत्र दिसले होते.

सिद्धार्थच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो अखेरचा अजय देवगणच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'थँक गॉड' चित्रपटात दिसला होता. याशिवाय तो लवकरच रोहित शेट्टीच्या 'इंडियन पुलिस फोर्स' या वेब सिरीजमध्ये दिसणार आहे. ही सिरीज अमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे. दुसरीकडे, सिद्धार्थ आणि कियाराबद्दल बोलायचे झाले तर, दोघेही 2021 मध्ये 'शेरशाह' चित्रपटात एकत्र दिसले होते.

बातम्या आणखी आहेत...