आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी 6 फेब्रुवारीला जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. दरम्यान, सिद्धार्थ मल्होत्रा आपल्या कुटुंबासह जैसलमेरला पोहोचला आहे. शनिवारी (5 फेब्रुवारी) रात्री तो जैसलमेर विमानतळाबाहेर तो ब्लॅक लूकमध्ये दिसला.
आम्ही खूप उत्साहित आहोत - सिद्धार्थचा भाऊ
सिद्धार्थ आणि कियारा यांच्या ग्रँड वेडिंगला त्याचे कुटुंबीय आणि मित्रमंडळीही पोहोचू लागली आहेत. सिद्धार्थनंतर त्याचे वडील सुनील मल्होत्रा, आई रीमा मल्होत्रा, वहिनी पूर्णिमा आणि भाऊ हर्षद मल्होत्रा देखील स्पॉट झाले होते. विमानतळावर सिद्धार्थचे वडील व्हीलचेअरवर दिसले. चालत असताना सिद्धार्थचा भाऊ पापाराझींना म्हणाला, 'आम्ही खूप उत्साही आहोत.'
मनीष मल्होत्रासोबत दिसली कियारा
सिद्धार्थ आणि त्याच्या कुटुंबापूर्वी कियारा विमानतळावरून बाहेर पडताना दिसली. यादरम्यान ती फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासोबत दिसली. व्हाइट आउटफिटमध्ये कियारा खूपच सुंदर दिसत होती. यानंतर कियाराचे वडील जय जगदीप अडवाणी, आई जेनेविव्ह जाफरी आणि आजीही दिसल्या.
सूर्यगढ पॅलेसच्या 80 खोल्याही बुक
जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये पाहुण्यांसाठी एक लक्झरी व्हिला बुक करण्यात आल्याचे वृत्त आहे. यात सुमारे 80 खोल्या आहेत. इतकंच नाही तर या जोडप्याच्या लग्नात कडेकोट सुरक्षा व्यवस्था देखील ठेवण्यात आली असून, लग्नाआधीपासून ते लग्नापर्यंतचे सर्व सोहळे पॅलेसमध्येच ठेवण्यात येणार आहेत. या पॅलेसमधील लग्नासाठी दररोजचे भाडे 1 ते 2 कोटी रुपयांच्या जवळपास असल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच पाहुण्यांना नेण्यासाठी मर्सिडीज बेंझ, जग्वार आणि बीएमडब्ल्यूसह सुमारे 70 कारची व्यवस्था करण्यात आली आहे.
अमिताभ बच्चन ते ईशा अंबानी या लग्नाला हजेरी लावणार आहेत
सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाच्या गेस्ट लिस्टमध्ये बॉलिवूडपासून इतर क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये अमिताभ बच्चनपासून शाहरुख खान, करण जोहर, वरुण धवन आणि ईशा अंबानीपर्यंत अनेक सेलिब्रिटींच्या नावांचा समावेश आहे. शाहिद कपूर आणि मीरा राजपूत देखील लग्नाला उपस्थित राहणार आहेत. कियारा आणि शाहिद खूप जवळचे मित्र आहेत. यासोबत कियारा-सिद्धार्थ त्यांच्या बालपणीच्या मित्रांनाही लग्नाचे निमंत्रण देण्यात आले आहे.
शाहरुखचा एक्स बॉडीगार्ड लग्नाची सुरक्षा पाहणार
सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाच्या सुरक्षेची जबाबदारी शाहरुख खानचा एक्स बॉडीगार्ड यासीन युगल याच्यावर सोपवण्यात आल्याचे वृत्त आहे. 3 फेब्रुवारीला सुरक्षा रक्षकांची टीम मुंबईहून जैसलमेरला रवाना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या लग्नाला अमिताभ बच्चन, शाहरुख खान, करण जोहर, वरुण धवन, शाहिद कपूर-मीरा राजपूत आणि ईशा अंबानीसह अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे लग्नापूर्वी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
लग्नानंतर मुंबईत होणार आहे ग्रँड वेडिंग रिसेप्शन
या जोडप्याशी संबंधित एका सूत्राने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, सिद्धार्थ आणि कियारा यांचे प्री-वेडिंग फंक्शन 4 आणि 5 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. लग्नाच्या दिवशीच त्यांचा हळदी आणि संगीत सोहळाही होणार आहे. जैसलमेरमध्ये लग्नानंतर हे जोडपे मुंबईत ग्रँड वेडिंग रिसेप्शनचे आयोजन करणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.