आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'शेरशाह' या चित्रपटात कॅप्टन विक्रम बत्राच्या भूमिकेसाठी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचे सर्वत्र कौतुक होत आहे. आता आगामी 'मिशन मजनू' या चित्रपटातदेखील देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेत तो दिसणार आहे. फरक एवढाच आहे की 'मिशन मजनू'मध्ये तो आर्मी ऑफिसर नव्हे तर पाकिस्तानमध्ये आपली ओळख लपवणा-या रॉ एजंटच्या भूमिकेत दिसेल.
सिद्धार्थचे पात्र सत्तरच्या दशकात पाकिस्तानात राहून तेथील अण्वस्त्र चाचण्यांची माहिती लीक करुन ते उधळून लावते. सिद्धार्थने दोन दिवसांपूर्वीच मुंबईतील शेड्युल पूर्ण केले. चित्रपटाचे डीओपी बिजितेश डे यांनी शूटिंगसंबंधित डिटेल्स सांगितले आहेत.
लखनौत रिक्रिएट करण्यात आला पाकिस्तान
बिजितेश डे म्हणाले- "या चित्रपटात रिक्रिएटेड पाकिस्तान हे देखील एक महत्त्वाचे पात्र आहे. ते सत्तरच्या दशकातील आहे. आव्हान होते की आम्हाला एक असा पाकिस्तान दाखवायचा होता जो मुस्लिम बहुल राष्ट्र बांगलादेश आणि मलेशिया सारखा भासू नये. म्हणून मग आम्ही पाकिस्तानी लोकांची राहणीमान, कल्चरल डिफरन्सेस यावर संशोधन केले. आम्ही लखनौच्या कोणत्याही एका भागात शूटिंग केले नाही. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गेलो. आणि चित्रीकरण केले. त्यानंतर संवाद उर्दूमध्ये आहेत. जेणेकरून तत्कालीन पाकिस्तान बनावट वाटू नये.
असा असेल सिद्धार्थचा लूक
शूटच्या फावल्या वेळेत सिद्धार्थ आणि रश्मिकाचा आवडता छंद म्हणजे क्रिकेट हा होता. दोघांनीही त्यांचा गेटअप आणि मेकअप भडक होऊ दिला नाही. सिद्धार्थचे पात्र पाकिस्तानात मुस्लिम म्हणून राहताना दाखवले आहे. तो पठाणी सूट, टॉवेल, कॅपमध्ये दिसणार आहे. त्याच्या डोळ्यांत सुरमादेखील आहे, परंतु ठराविक व्यावसायिक चित्रपटांमध्ये मुस्लिम तरुणांच्या डोळ्यांवर जसा सुरमा असतो, तसा सिद्धार्थच्या डोळ्यांत दिसणार नाही. मेकअप टीमने सिद्धार्थचा लूक वास्तववादी ठेवला आहे. चित्रपटातील अॅक्शन रवी वर्मनचे आहे. शंतनू बागची हे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. जाहिरात विश्वात ते प्रसिद्ध आहेत. 'मिशन मजनू' ही त्यांची पहिली फिचर फिल्म आहे.
सिद्धार्थचे आगामी प्रोजेक्ट
याशिवाय सिद्धार्थ अल्लू अर्जुनसोबत 'डीजे'च्या रिमेकची तयारीही करत आहे. चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, यात त्याची दुहेरी भूमिका असेल. बहुतेक शूटिंग कॅनडामध्ये केली जाईल. हा चित्रपट फ्लोअरवर कधी येणार त्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल. दुसरीकडे, सिद्धार्थच्या जवळच्या मित्रांनी सांगितले की, सिद्धार्थ काही उत्तम लेखकांच्या शोधात आहे. 'लुडो' आणि 'हाथी मेरे साथी' या चित्रपटांची स्क्रिप्ट न आवडल्याने सिद्धार्थने हे चित्रपट नाकारले होते. 'लुडो' नाकारल्यानंतर त्याची जागा आदित्य रॉय कपूरने घेतली. 'हाथी मेरे साथी'मध्ये पुलकित सम्राटची वर्णी लागली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.