आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल आहे. काही महिन्यांपूर्वीच दोघे शाही थाटात लग्नगाठीत अडकले. लग्नानंतर सार्वजनिक ठिकाणी दोघे फोटोग्राफर्सना आवर्जून एकत्र पोज देत असतात. अलीकडेच हे दोघेही मुंबई विमानतळावर दिसले. ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.
पापाराझी म्हणाले - भैय्या भाभी
विमानतळावर सिद्धार्थ आणि कियारा कॅज्युअल लूकमध्ये दिसले. कियाराने पांढऱ्या पँटसोबत जॅकेट कॅरी केले होते. तर सिद्धार्थने पांढऱ्या पँटसोबत मॅचिंग टी-शर्ट घातला होता.. त्यावर त्याने डेनिम जॅकेट घातले होते. या कपलला पाहताच चाहत्यांनी सेल्फीसाठी त्यांना घेरले. यादरम्यान दोघांनीही फॅन्ससोबत फोटो क्लिक केले. यावेळी एका फोटोग्राफरने सर्वांसमोर सिद्धार्थ-कियाराला भैय्या-भाभी अशी हाक मारली. त्यावर कियाराने दिलेली प्रतिक्रिया आता व्हायरल होत आहे. भाभी ही हाक ऐकून कियारा लाजली आणि तिने हसत फोटोंना पोज दिल्या.
याचवर्षी 7 फेब्रुवारीला दोघांचे झाले लग्न
कियारा आणि सिद्धार्थ यावर्षी 7 फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकले. लग्नाला दोन्ही कुटुंबातील 150 पाहुणे उपस्थित होते. नातेवाईकांव्यतिरिक्त करण जोहर, शाहिद कपूर, ईशा अंबानी दोघांच्या लग्नात हजर होते.
'शेरशाह'मध्ये एकत्र दिसले होते सिद्धार्थ आणि कियारा
सिद्धार्थ आणि कियाराने 2021 मध्ये आलेल्या 'शेरशाह' चित्रपटात एकत्र काम केले होते. सिद्धार्थच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो लवकरच रोहित शेट्टीच्या आगामी 'इंडियन पुलिस फोर्स' या वेब सिरीजमध्ये दिसणार आहे. ही सिरीज Amazon Prime वर रिलीज होणार आहे.
दुसरीकडे, कियारा लवकरच 'सत्यप्रेम की कथा'मध्ये दिसणार आहे. 29 जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात तिच्यासोबत कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय ती 'गेम चेंजर' या तेलगू चित्रपटात राम चरणसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.